विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:45 AM2019-07-15T10:45:28+5:302019-07-15T10:45:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता  दिनांकावर आधारीत मतदार यादी ...

The assembly elections are underway | विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू

विधानसभा निवडणुकीचे पडघम सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता  दिनांकावर आधारीत मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवार 15 जुलै रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या मतदारांना नोंदणीसाठी आणखी एक संधी मिळावी यासाठी दुसरा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. पुनरीक्षण कार्यक्रमानुसार 15 जुलै रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात येईल. प्रारुप यादीविषयी हरकती व आक्षेप 30 जुलैपयर्ंत नोंदविता येतील. मतदार नोंदणी व मतदार यादी पुनरीक्षणासाठी 20 व 21 जुलै तसेच 27 व 28 जुलै रोजी विशेष      मोहिमेचे आयोजन करण्यात येईल. 5 ऑगस्ट रोजी पर्यवेक्षक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचेमार्फत पडताळणी करण्यात येणार असून 13 ऑगस्टपयर्ंत हरकती व आक्षेप निकालात काढण्यात येतील. जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार यादी निरीक्षक आणि मुख्य निवडणूक अधिका:यांनी तपासणी केल्यानंतर 19 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत अर्हता दिनांकानुसार पात्र मतदारांची नावनोंदणी करण्यात येणार असून मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. 
जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे संबंधित अधिका:यांना या वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही करून याद्यांमधील त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
अद्याप मतदार नोंदणी न केलेल्या पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करावी व मतदार यादीबाबत काही आक्षेप अथवा हरकती असल्यास संबंधित तहसील कार्यालयात    विहीत मुदतीत सादर करावे.  मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी मंजुळे यांनी सांगितले.    
 

Web Title: The assembly elections are underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.