संचमान्यतेनुसार मुख्याध्यापकांची 60 तर शिक्षक व विषय शिक्षकांची 615 पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:06 PM2018-11-15T13:06:27+5:302018-11-15T13:06:47+5:30

नंदुरबार : सन 2018-2019 च्या संचमान्यतेला मंजुरी देण्यात आली असून यात, प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापकांची 60, प्राथमिक शिक्षकांची 422 ...

According to the permit, 60 posts of Principals and 615 posts of Teachers and Subject teachers are vacant | संचमान्यतेनुसार मुख्याध्यापकांची 60 तर शिक्षक व विषय शिक्षकांची 615 पदे रिक्त

संचमान्यतेनुसार मुख्याध्यापकांची 60 तर शिक्षक व विषय शिक्षकांची 615 पदे रिक्त

googlenewsNext

नंदुरबार : सन 2018-2019 च्या संचमान्यतेला मंजुरी देण्यात आली असून यात, प्राथमिक शिक्षण विभागातील मुख्याध्यापकांची 60, प्राथमिक शिक्षकांची 422 तर विषय शिक्षकांची 193 पदे रिक्त असल्याची माहिती आह़े अतिरिक्त शिक्षक नसल्याने परिणामी बदलीपासून शिक्षकांना दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आह़े
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या 1 हजार 386 जिल्हा परिषद शाळेच्या संचमान्यतेची कामे पूर्ण झालेली आहेत़ सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी पोर्टलवर संचमान्यतेसंबंधी माहिती भरलेली आह़े 
संचमान्यतेमुळे शाळेतील पटसंख्या त्यावरुन अतिरिक्त ठरलेले शिक्षक, एकूण मंजुर जागा, रिक्त जागा आदींची माहिती मिळण्यास मदत होत असत़े 2018-2019 वर्षातील संचमान्यतेचे काम पूर्ण झाले असून त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील एकूण 1 हजार 386 शाळांची माहिती पोर्टलवर भरण्यात आली आह़े त्यात, मुख्यध्यापकांची एकूण मंजूर पदे 167, भरलेली पदे 109 तर रिक्त पदांची संख्या 60 आह़े प्राथमिक शिक्षकांची एकूण मंजूर पदे 3               हजार 994, भरलेली पदे 3 हजार            572 तर रिक्त पदे 422 इतकी            आहेत़ विषय शिक्षकांची मंजूर पदे 315, भरलेली पदे 122 तर रिक्त पदांची संख्या 193 इतकी आह़े अशा प्रकारे 60 मुख्याध्यापक तर           प्राथमिक शिक्षक व विषय शिक्षक मिळून 615 शिक्षकांची पदसंख्या रिक्त आहेत़
सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती
मुख्यध्यापकांची एकूण 60 पदे रिक्त असल्याने प्राथमिक शिक्षक व विषय शिक्षक यांतून पदोन्नतीव्दारे मुख्याध्यापकांची पदे भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून             देण्यात आली़ तसेच विषय शिक्षकांची पदे प्राथमिक शिक्षकांमधून सेवा जेष्ठतेनुसार भरली जाणार आहेत़ व यातून जेवढे प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे राहतील, तेवढी राज्य शासनाकडून भरण्यात येत असतात़ 
दरम्यान, मुख्यध्यापकांकडून संचमान्यतेअंतर्गत शाळेत विद्याथ्र्याची असलेली पटसंख्या, एकूण शिक्षकांची संख्या, विषय शिक्षकांची संख्या आदी माहितीची पूर्तता करण्यात येत असत़े विद्याथ्र्याची पटसंख्या कमी असल्यास शिक्षक अतिरिक्त ठरत असतात़ तर विद्याथ्र्याची पटसंख्या वाढल्यास शिक्षकांची पदे रिक्त ठरत असतात़ मग शिक्षकांच्या अतिरिक्त पदांचे समायोजन करणे, ऑनलाईन पध्दतीने शिक्षक बदली प्रक्रिया राबवणे आदी कामे लागत असतात़ गेल्या काही वर्षापासून प्राथमिक शिक्षण  विभागात विद्याथ्र्याची पटसंख्या समाधानकारक असल्याचे दिसून येत आह़े 
ग्रामीण तसेच दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्याथ्र्याची सतत घटनारी पटसंख्या शिक्षकांच्या मुळावर उठत असत़े पटसंख्या कमी होत असल्याने               शिक्षक  अतिरिक्त ठरत असतात़ त्यामुळे बदलीच्या प्रक्रियेला                 सामोरे जात शिक्षकांची गैरसोय               होत असत़े विद्याथ्र्याची पटसंख्या, अतिरिक्त ठरणा:या शिक्षकांची             संख्या ही संचमान्यतूनसारच ठरत असत़े
शिक्षक भरतीची प्रतीक्षा
राज्य शासनाकडून शिक्षकांची भरती रोखण्यात आली होती़ परंतु आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितल्यानुसार लवकरच शिक्षकांची भरती करण्यात येणार आह़े त्यामुळे शिक्षकांवरील भार या माध्यमातून काहिसा हलका होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े शिक्षक  भरतीमुळे रिक्त जागांची समस्या मिटणार असून परिणामी शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहण्यासही मदत होणार असल्याचे सांगण्यात येत          आह़े
युडायसचे फिडींग सुरु
संचमान्यतेसह विविध माहितींचे संकलन करण्यासाठी युडायसचा वापर करण्याचे प्रयोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येत आह़े त्यामुळे 48 पानी कागदांवर माहिती भरण्यापासून शिक्षकांना दिलासा मिळणार आह़े सध्या ही पध्दत विचाराधिन असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आह़े लवकरात लवकर ही प्रणाली वापरात येणार आह़े
 

Web Title: According to the permit, 60 posts of Principals and 615 posts of Teachers and Subject teachers are vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.