वीजचोरी प्रकरणात दोघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 04:42 AM2018-04-07T04:42:52+5:302018-04-07T04:42:52+5:30

वीजचोरी करताना पकडल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण करणा-यांना बिलोली न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे.

 Power scam: | वीजचोरी प्रकरणात दोघांना सक्तमजुरी

वीजचोरी प्रकरणात दोघांना सक्तमजुरी

googlenewsNext

बिलोली (जि. नांदेड)  - वीजचोरी करताना पकडल्यानंतर वीज कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत त्यांना मारहाण करणाºयांना बिलोली न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे.
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे मुख्य वीज वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी केली जात असल्याची माहिती महावितरण कंपनीच्या कर्मचाºयांना मिळाली होती. त्यावरून २४ फेब्रुवारी २०१५ रोजी कारवाई करीत दत्तराम बामणे व शिवराज कोटनोड दोघांवर कारवाई करण्यात आली. या वेळी दोघांनी वीज कंपनीच्या कर्मचाºयांशी हुज्जत घातली. तसेच त्यांना मारहाणही केली होती. याप्रकरणी बिलोली कनिष्ठ न्यायालयात चाललेल्या खटल्यात पाच जणांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अखेर न्या. पी. के. मुटकुले यांच्या न्यायालयाने बामणे व कोटनोड यांना वीजचोरीप्रकरणी एक वर्ष आणि कर्मचाºयांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल सहा महिने अशी एकत्रित शिक्षा आणि प्रत्येकी दोन हजारांचा दंड ठोठावला.

Web Title:  Power scam:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.