पदाधिकारी आचारसंहितेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:40 AM2019-04-28T00:40:42+5:302019-04-28T00:44:05+5:30

शहरावर विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण झालेली पाणीबाणी सोडविण्यासाठी महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग या विभागांची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र अद्यापही आचारसंहितेतच आहेत.

municipal corporation leader live in code of conduct | पदाधिकारी आचारसंहितेतच

पदाधिकारी आचारसंहितेतच

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीबाणी ना बैठक, ना चर्चाप्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र धावपळ सुरु

नांदेड : शहरावर विशेषत: दक्षिण नांदेडमध्ये निर्माण झालेली पाणीबाणी सोडविण्यासाठी महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग या विभागांची धावपळ सुरु आहे. दुसरीकडे महापालिकेतील पदाधिकारी मात्र अद्यापही आचारसंहितेतच आहेत. १८ एप्रिल रोजी मतदान झाल्यानंतर आचारसंहिता संपली तरी ती निश्चितपणे शिथील झाली आहे. महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवकांनी मात्र या विषयाला अद्यापही मनावर घेतले नाही.
नांदेड शहराला २३ एप्रिलपासून दोन ऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. प्रकल्पात केवळ ८.५ दलघमी म्हणजेच ९.९५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. निवडणुका संपताच प्रशासकीय यंत्रणेला पाण्याचे गांभीर्य कळाले. महापालिकेने दोनऐवजी तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. तर खुद्द जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनीही नांदेडच्या पाणीप्रश्नावर स्वतंत्रपणे बैठक घेतली. त्यानंतर २६ एप्रिल रोजी विष्णूपुरी प्रकल्पास भेट देवून प्रत्यक्ष पाणी स्थितीची पाहणीही केली. विष्णूपुरीतील अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी तीन पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. महावितरणला प्रकल्प क्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.
एकीकडे प्रशासकीय यंत्रणेकडून पाणीबाणीचा दररोज आढावा घेतला जात असताना महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक मात्र अद्यापही आचारसंहितेच्याच अंमलाखाली आहेत. पाणी विषयावर एकाही पदाधिकारी अथवा नगरसेवकांनी प्रशासनाकडे साधी विचारणाही केली नाही. पाण्यासारख्या अत्यावश्यक बाबीवर महापौरासह इतर पदाधिकाऱ्यांनी बैठक घेणे अपेक्षित होते. १८ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आचारसंहिता कालावधीतही पाण्यासारख्या विषयावर निर्णय घेता येतात. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत आचारसंहितेचा बाऊ करुन पाणीटंचाई निवारणाची कामे अडवू नका, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतानाही महापालिकेची आचारसंहिता मात्र अद्यापही कायमच आहे.
दरम्यान, उत्तर नांदेडला इसापूर प्रकल्पाचे पाणी सांगवी बंधाºयातून पुरविले जात आहे. काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी घेतले जात आहे. तेथून संपूर्ण उत्तर नांदेडसह दक्षिण नांदेडच्या काही भागालाही पाणी दिले जात आहे. इसापूरमधून चौथी पाणीपाळी घेण्यात आली आहे. आणखी एक पाणीपाळी मे मध्ये उपलब्ध होणार आहे.
सरपंच, ग्रामसेवकांची बैठक
विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातून होणारा अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी तीन पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यातील दोन पथके शनिवारी प्रकल्प क्षेत्रात गस्तीवर पोहोचले. या पथकांनी प्रकल्प क्षेत्राच्या दोन्हीही बाजूंनी असलेल्या ९ गावांमध्ये सरपंच, ग्रामसेवक तसेच गावातील प्रमुख व्यक्तींची बैठक घेतली. नांदेड शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाल्याचे सांगताना जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाबाबतही गावकºयांना अवगत करण्यात आले. प्रकल्पावर बसविलेल्या मोटारी स्वत: शेतकºयांनी काढून घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या मोटारी न काढल्यास त्या जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

Web Title: municipal corporation leader live in code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.