मुखेड तालुक्यात सौर पथदिव्यावरील लाखो रुपये पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:02 AM2018-06-01T01:02:47+5:302018-06-01T01:02:47+5:30

तालुक्यातील १२८ ग्रामपंचायती अंतर्गत १५२ गावामध्ये नागरिकांना भौतिक सुविधा देण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन सौर पथदिवे बसवून विद्युत बचतीवर मात करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सौर पथदिव्यांची दयनीय अवस्था आहे. यामुळे लाखोंचा खर्च वाया गेला.

Millions of rupees on solar street lights in Mukhed taluka | मुखेड तालुक्यात सौर पथदिव्यावरील लाखो रुपये पाण्यात

मुखेड तालुक्यात सौर पथदिव्यावरील लाखो रुपये पाण्यात

Next

दत्तात्रय कांबळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुखेड : तालुक्यातील १२८ ग्रामपंचायती अंतर्गत १५२ गावामध्ये नागरिकांना भौतिक सुविधा देण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन सौर पथदिवे बसवून विद्युत बचतीवर मात करण्याचा प्रयत्न झाला, मात्र सौर पथदिव्यांची दयनीय अवस्था आहे. यामुळे लाखोंचा खर्च वाया गेला. मोहीम राबविणारे ग्रामसेवक, सरपंच आणि वस्तू पळविणारे मात्र मालामाल झाले.
पंचायत समितीच्या तालुक्यातील अभिलेखावरुन सन २०१६-१७ मध्ये कलंबर ३ लाख ५ हजार ७२१ रुपये, कुंद्राळ १ लाख ८९ हजार ५०० रुपये, कोटग्याळ २ लाख ७३ हजार ५०० रुपये, खैरका २ लाख ७९ हजार ९९० रुपये, माकणी १ लाख १६ हजार ७०० रुपये, रावी ३ लाख ९६ हजार ९०० रुपये, लादगा २ लाख २७ हजार ४०० रुपये, जांब खु. १९ हजार रुपये, जांबळी १ लाख ८६ हजार ७५० रुपये, तारदडवाडी १ लाख ४५ हजार २५० रुपये, दापका राजा २ लाख ८४ हजार २५० रुपये, नंदगाव प.क. १ लाख ३७ हजार ५० रुपये, फुटकळवाडी २ लाख ७० हजार रुपये, शिरुर दबडे २ लाख ८४ हजार २५० रुपये, सलगरा खु. २ लाख २६ हजार ८०० रुपये, सावरमाळ २ लाख ९५ हजार रुपये, हसनाळ प.दे. २ लाख २७ हजार ४०० रुपये असे एकूण सन १६-१७ मध्ये सौर उर्जेवर एकूण ३७ लाख, ७९ हजार १६१ रुपये खर्च झाला आहे.
तर सन २०१७-१८ मध्ये धामणगाव २लाख ७७ हजार ५५० रुपये, कामजळगा ८० हजार व २ लाख ३९ हजार ४०० रुपये, खैरका ६३ हजार ६०० रुपये, मांजरी ३ लाख २८ हजार ७६७ रुपये, उमरदरी १ लाख ४८ हजार ४०० रुपये, कोळनुर ७६ हजार ५९७ रुपये, परतपुर ५८ हजार ३५० रुपये, सुगाव बु. २ लाख ४९ हजार ५०० रुपये, सुगाव खु..५८ हजार ५३० रुपये, निवळी ५९ हजार रुपये, उंद्री प.मु. १ लाख ३८ हजार ८५३ रुपये, खतगाव प.दे. १ लाख ४८ हजार ७५० रुपये, भाटापुर प.दे. ६४ हजार ५७५ रुपये, बावनवाडी २ लाख ९६ हजार ८०० रुपये, बामणी २ लाख ९९ हजार ४२० रुपये, कोळगाव १ लाख १८ हजार ५०० रुपये, कर्णा १ लाख ७७ हजार ७५० रुपये असा एकूण २८ लाख ८४ हजार ०४२ एवढा खर्च झाला़ खर्च तर दोन वर्षातला एकूण खर्च ६६ लाख ६३ हजार २०३, असे एकूण ३४ गावे आहेत. तर इतर गावांची शासकीय अभीलेखात नोंद नाही. गावातील सौर दिवे मोडकळीस आले. काही सौर दिवे बंद, काही लहानसा प्रकाश असे आहेत़ काहींच्या बॅटऱ्या चोरट्यांनी पळविल्या़ तर काही खांबाचे बल्ब चोरले काही खांब रिकामेच़ ना बल्ब ना बॅटरी़
तालुक्यात ९० टक्के सौर पथदिवे बंद तर १० टक्के सौर पथदिवे चिमणीच्या प्रकाशासारखे टिमटिमताना दिसतात़ फक्त नावालाच सौर दिवा. एका दिव्यामागे २४ ते २५ हजार रुपये खर्चून सगळा पैसा पाण्यात गेला. यात मात्र ग्रामसेवक, सरपंच व चोरी करणारे चोर हे मात्र मालामाल झाले.

Web Title: Millions of rupees on solar street lights in Mukhed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.