किनवट पालिका निवडणुकीत आघाडीतील बिघाडी भाजपाच्या पथ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 05:59 PM2017-12-15T17:59:42+5:302017-12-15T18:17:04+5:30

नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळविला़ गेल्या निवडणुकीत एकही नगरसेवक नसलेल्या भाजपाने यावेळी पालिकेवर सत्ताच मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या घरचा रस्ता दाखविला़ राष्ट्रवादी व काँग्रेसमधील जागा वाटपातील बिघाडी आणि दोन्ही पक्षातील अति आत्मविश्वास त्यांना नडला.

In the Kinwat municipal elections, the battle against the alliance lies on the BJP's path | किनवट पालिका निवडणुकीत आघाडीतील बिघाडी भाजपाच्या पथ्यावर 

किनवट पालिका निवडणुकीत आघाडीतील बिघाडी भाजपाच्या पथ्यावर 

googlenewsNext
ठळक मुद्दे सेनेचे खातेही उघडले नाही  नव्या चेह-यांनी केले संधीचे सोने

- गोकुळ भवरे

किनवट (नांदेड )  : नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळविला़ गेल्या निवडणुकीत एकही नगरसेवक नसलेल्या भाजपाने यावेळी पालिकेवर सत्ताच मिळवून राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या घरचा रस्ता दाखविला़ राष्ट्रवादी व काँग्रेसमधील जागा वाटपातील बिघाडी आणि दोन्ही पक्षातील अति आत्मविश्वास त्यांना नडला.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता पालिकेवर होती़  याही वेळी दोन्ही पक्षांची आघाडी होईल असे काहीसे चित्र होते़ मात्र ऐनवेळी आघाडी फिसकटल्याने जोड काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने पक्षश्रेष्ठींचाही नाईलाज झाला़ दोन्ही काँग्रेसने स्वतंत्र निवडणुका लढविल्या़ त्यांचा हा निर्णय पायावर दगड पाडून घेतल्यासारखा झाला़ आघाडी होण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण व राष्ट्रवादीचे आ़प्रदीप नाईक यांनी तयारी केली होती़ सुरुवातीच्या चर्चेनुसार राष्ट्रवादीने नगराध्यक्षासह ९ जागा व काँग्रेसने ९ जागा लढविण्याचे ठरविले़ मात्र दोन्ही पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांना हा निर्णय मान्य नव्हता़ आघाडी झाली असती तर सत्ता गमवण्याची ही वेळ दोन्ही पक्षांवर आली नसती़ आ़प्रदीप नाईक मागील १५ वर्षांपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात़ 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये उघड दोन गट पडले होते़ भाजपाचे नेते अशोक सूर्यवंशी पाटील यांनी प्रचाराची फिल्डींग लावून संपूर्ण यंत्रणेवर घट्ट पकड ठेवली होती़ तिकीट वाटप हे त्यांच्याच मर्जीप्रमाणे झाले़ एक-दोन ठिकाणी मर्जी तोडून तिकीट वाटप झाली़ तरीही पाटलांनी इमाने इतबारे भाजपा उमेदवाराचा प्रचार केला़ नव्या चेहºयांना संधी दिली़ निवडणुकीच्या प्रारंभी चौरंगी लढत होईल असे चित्र होते़ अंतिम टप्प्यात मात्र तिरंगी लढतीचे चित्र पहायला मिळाले़ नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हबीबोद्दीन चौव्हाण यांनी तिसºया क्रमांकाची मते मिळविली़ त्यांची उमेदवारी काँग्रेसचे शेख चाँदसाब यांना महागात पडली़ मुस्लिम समाजाच्या मताचे विभाजन झाले व भाजपाचे आनंद मच्छेवार यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला़ १५ वर्षापासून पालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती़ सत्तेत बदल व्हावा ही मानसिकताही मतदारांनी तयार करून ती मतपेटीतून दाखवून दिली.

याचा परिणाम असा झाला की भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले़ एकूणच किनवट पालिकेवर भाजपाचे कमळ फुलणे हे आ़प्रदीप नाईक यांना धक्का देणारे ठरले आहे़ आ़नाईक मागील १५ वर्षापासून किनवटचे प्रतिनिधित्व करतात़ विधानसभा निवडणुका दोन वर्षावर आल्या असताना त्यांच्या हातातून पालिका निसटावी हे त्यांना धोक्याचे ठरणार आहे़   लोकांना कामे दाखवावे लागतील़ असे झालेच तर प्रदीप नाईक यांना विधानसभा निवडणुकीत भवितव्य आहे असे म्हणावे लागेल़  दरम्यान, भाजपाच्या या यशामुळे जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे़

शिस्तबद्ध प्रचारयंत्रणेचेही यश
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची किनवटला प्रचारसभा झाली़ भाजपाचा प्रचार शिस्तबद्ध व सूत्रबद्ध होईल या दृष्टीने प्रयत्न केले़ त्यात त्यांना यशही मिळाले़ परिणामी भाजपाच्या हाती एकहाती सत्ता आली़ भाजपासोबत युती करूच नये असा पक्षश्रेष्ठींचाच आदेश असल्याने निवडणुकीत सेना-भाजपाची युती झाली नाही़ मागील सभागृहात शिवसेनेचे सदस्य होते़ आता त्यांना भोपळाही फोडता आला नाही.

Web Title: In the Kinwat municipal elections, the battle against the alliance lies on the BJP's path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.