किनवट नगर पालिकेत भाजपा झिरो ते हिरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:52 AM2017-12-15T00:52:58+5:302017-12-15T00:53:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क किनवट : पालिका निवडणुकीत नगराध्यक्षसह नगरसेवक पदाच्या ९ जागा असून भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले. ...

In the Kinwat Municipal Corporation, BJP Ziro to Hero | किनवट नगर पालिकेत भाजपा झिरो ते हिरो

किनवट नगर पालिकेत भाजपा झिरो ते हिरो

googlenewsNext
ठळक मुद्देकिनवट पालिका निवडणूक: राष्टÑवादी व काँग्रेसच्या प्रत्येकी २ जागा घटल्या




लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : पालिका निवडणुकीत नगराध्यक्षसह नगरसेवक पदाच्या ९ जागा असून भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळविले. सत्ताधारी राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा व सत्ताही गमवावी लागली़ शिवसेनेची पार पिछेहाट झाली. यावेळी त्यांना खातेही उघडता आले नाही, काँग्रेसला दोन जागांचे नुकसान झाले. मावळत्या पालिकेत एकही सदस्य नसलेल्या भाजपाने चक्क कमळ फुलवून सर्वांना धक्का दिला.
१३ डिसेंबर रोजी मतदान झाले, १४ रोजी मतमोजणी झाली. यात नगराध्यक्षपद भाजपाकडे आले, सदस्य पदाच्या १८ पैकी ९ जागा भाजपाने मिळविल्या, राष्टÑवादीने ६, काँग्रेसने २ तर १ ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद चन्नप्पा मच्छेवार यांनी ६ हजार ३५८ मते मिळवत विजय मिळविला़ काँग्रेसचे शेख चाँदसाब रतनजी यांनी ४ हजार ५४७ मते मिळवून दुसºया क्रमांकावर राहिले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार हबीबोद्दीन चौव्हाण यांनी २ हजार ९८१ मते घेत तिसºया क्रमांकावर राहिले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण राठोड यांनी २ हजार ७४८ मते घेवून चौथ्या स्थानावर राहिले़ शिवसेनेचे सुनील पाटील यांनी केवळ १ हजार ३०२ मते घेतली़
विजयी उमेदवार, पक्ष,
प्रभाग क्रमांक, मते- प्रभाग १ अ- अनु़जमाती महिला- जिजाबाई सखाराम मेश्राम (भाजपा, ९०३ मते), ब - सर्वसाधारण- व्यंकटराव गोपाळराव नेम्मानीवार (भाजपा, ९९८ मते), प्रभाग २ अ- अनु़जाती महिला- अनुसया मधुकर आनेलवार (भाजपा, ७८३ मते), ब - सर्वसाधारण- श्रीनिवास किशनराव नेम्मानीवार (१५३९), प्रभाग ३ अ - नामाप्र महिला- अनिता शिवा क्यातमवार (भाजपा, ७०१), ब - सर्वसाधारण- अजय शंकरराव चाडावार (भाजपा, ९४९), प्रभाग ४-अ- सर्वसाधारण महिला- काझी राहत तबस्सुम शफीयोद्दीन (राष्ट्रवादी काँग्रेस, ६६८), ब - सर्वसाधारण- खान साजीद खान निसारखान (राष्ट्रवादी काँग्रेस, ७२०), प्रभाग ५ अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री- तवर खुतीजा बाबु (अपक्ष, ७७१), ब - सर्वसाधारण- पठाण जहीरोद्दीन खैरोद्दीन (राष्ट्रवादी काँग्रेस, ७५५), प्रभाग ६अ- नामाप्र- शिवाजी निवृत्तीराव आंधळे (भाजपा, ७३९), ब- सर्वसाधारण स्त्री- सिरमनवार रजनी नरेंद्र (भाजपा, १०५६), प्रभाग ७ अ- नामाप्र स्त्री- पूजा बालाजी धोतरे (भाजपा, ५७७), ब - सर्वसाधारण - खान इमरान इसा (काँग्रेस, ४४९), प्रभाग क्ऱ८-अ- नामाप्र- अभय भीमराव महाजन (काँग्रेस, ६६४), ब- सर्वसाधारण स्त्री- हजीखान शहेरबानो निसारखान (राष्ट्रवादी काँग्रेस, ७१६), प्रभाग ९-अ- अनुसूचित जाती- कैलास रामराव भगत (राष्ट्रवादी काँग्रेस, ११६३), ब - सर्वसाधारण स्त्री- अब्दुल नसीम अ़लतीफ (राष्ट्रवादी काँग्रेस, १०३६)
निवडणुकीत विद्यमान नगरसेवक शिवसेनेचे सुनील पाटील, सुरज सातुरवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियंका राठोड, माजी नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका इंदुताई शत्रुघ्न कनाके, काँग्रेसचे कृष्णा नेम्मानीवार यांचा मतदारांनी दणदणीत पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी काम पाहिले़ त्यांना सहाय्य तहसीलदार तथा सहा़निवडणूक निर्णय अधिकारी नरेंद्र देशमुख, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केले़ उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो़नि़ विकास पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मतमोजणी काळात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता़
उमेदवार पक्ष मिळालेली मते
चौव्हाण हबीबोद्दीन वहीदोद्दीन अपक्ष २९८१
पाटील सुनील किशनराव शिवसेना १३०२
मच्छेवार आनंद चनप्पा भाजपा ६३५८
राठोड प्रवीण इंद्रसिंघ राष्टÑवादी २७४८
शेख चाँदसाब रतनजी काँग्रेस ४५४७
शेख फयाजोद्दीन फकरोद्दीन अपक्ष १३८
नगराध्यक्ष पदाचे उमेदवारनिहाय मतदान

Web Title: In the Kinwat Municipal Corporation, BJP Ziro to Hero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.