हदगावच्या मुस्लिम बांधवांनी केले अनोळखी इसमावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 01:00 AM2018-05-18T01:00:59+5:302018-05-18T01:00:59+5:30

जन्मलेल्या गावात अंत्यविधीला जागा मिळेना़ गावातीलच सगेसोयरे, समाज बांधव विरोधात असतात़ परंतु हदगावमध्ये मुस्लिम बांधवांनी अनोळखी इसमाचा अंत्यसंस्कार करुन माणुसकीचा झरा जिवंत ठेवून पवित्र रमजान महिन्यात पुण्य मिळविले आहे.

Funeral cremation by the Muslim brothers of Hadgaon | हदगावच्या मुस्लिम बांधवांनी केले अनोळखी इसमावर अंत्यसंस्कार

हदगावच्या मुस्लिम बांधवांनी केले अनोळखी इसमावर अंत्यसंस्कार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : जन्मलेल्या गावात अंत्यविधीला जागा मिळेना़ गावातीलच सगेसोयरे, समाज बांधव विरोधात असतात़ परंतु हदगावमध्ये मुस्लिम बांधवांनी अनोळखी इसमाचा अंत्यसंस्कार करुन माणुसकीचा झरा जिवंत ठेवून पवित्र रमजान महिन्यात पुण्य मिळविले आहे.
आंध्रप्रदेशमधील एक वेडसर इसम कित्येक महिन्यांपासून उमरखेड बसस्थानक ते शहर असे दररोज गतीने फिरत असे़ त्याला चालण्याची खूप घाई़ त्याची घाई पाहून अनेकांना वाटे याचा कधीतरी अपघात होतो़ झाले तसेच़ हा इसम उमरखेडहून हदगाव रस्त्यावर आला़ अज्ञात वाहनाच्या धडकेत तो रात्री मरण पावला़ या दोन्ही शहरांत त्याचे ना नातेवाईक ना सोयरे़ उमरखेड टी पाईपलाइन येथे त्यांचा मृतदेह मिळाल्याने हदगाव पोलीस निरीक्षक केशव लटपटे यांनी पी़एम़साठी मृतदेह सरकारी दवाखान्यात दाखल केले़ पोलिसांनी नगरपालिकेला अंत्यविधी करण्यासाठी पत्र दिले़ उपस्थित मुस्लिम बांधवांनी या अनोळखी इसमाचा अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेतली व सामाजिक भान जपले़ पवित्र रमजान महिन्यात या इसमाचा मृत्यू झाला़ त्यामुळे तो पवित्र इसम असावा, अशी कुजबूज कानावर पडत होती.
उमरखेड पोलिसांनी हात झटकले
उमरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघात घडला असताना ‘फुकटची कटकट नको’ म्हणून पेट्रोलिंगवर असताना मृतदेह हदगाव हद्दीत आणून टाकल्याची चर्चा शहरात रंगली होती़ मात्र, हदगावच्या मुस्लिम बांधवांनी माणुसकी दाखवित परायाला आपलेसे केले़ तालुक्यातील अनेक ठिकाणी अंत्यविधीसाठी अडवणूक होत असताना या घटनेने आदर्श घडविला़

रमजानमध्ये पवित्र काम
मुस्लिम बांधवांनी माणुसकीचा झरा जिवंत ठेवून पवित्र रमजान महिन्यात पुण्य मिळविले
इसम उमरखेडहून हदगाव रस्त्यावर आला़ वाहनाच्या धडकेत तो मरण पावला़
दोन्ही शहरात त्याचे ना नातेवाईक ना सोयरे
पवित्र रमजान महिन्यात मृत्यू झाल्याने तो इसम पवित्र असावा, अशी चर्चा आहे.

Web Title: Funeral cremation by the Muslim brothers of Hadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.