‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने

By शिवराज बिचेवार | Published: December 29, 2023 07:14 PM2023-12-29T19:14:28+5:302023-12-29T19:16:23+5:30

भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञातापूर्वक अभिवादन करण्यासाठी विशेष उपक्रम

Four small planes landed at Nanded airport | ‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने

‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानात नांदेडच्या विमानतळावर उतरली चार छोटी विमाने

नांदेड : राष्ट्रीय सैन्य मायक्रोलाइट अभियानांतर्गत २९ डिसेंबर रोजी सकाळी चार मायक्रोलाइट विमानांचे आगमन झाले. ‘पर्वत से सागर तिरंगा’ या अभियानांतर्गत भारतीय सैन्याच्या शौर्याला कृतज्ञातापूर्वक अभिवादन करण्यासाठी हे अभियान हाती घेतले असून त्याअंतर्गत ही विमानेनांदेड विमानतळावर दाखल झाली.

यावेळी लेफ्टनंट कर्नल ए.बी. टीएम, लेफ्टनंट कर्नल जितेंद्र सिवाच, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय अधिकारी विकास माने, विमानतळ सुरक्षा अधिकारी बोरगावकर, कॅप्टन संघमित्रा राई, मेजर गरिमा पुनियानी, कॅप्टन प्रियदर्शनी के. आदींची उपस्थिती होती.

राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत व्हावी तसेच नव्या पिढीला देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांचे शौर्य याबाबतची माहिती व्हावी, या उद्देशाने भारतीय सैन्याच्या वतीने काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत चार मायक्रोलाइट विमानाने मायक्रोलाइट अभियान सुरू केले आहे. या अभियानातून साहस व सांघिक कामाचे प्रदर्शन केले जाणार आहे. या विमानांचे वैमानिक राष्ट्रीय व सैन्य ध्वजाला गर्वाने अवकाशात फडकविणार आहेत. सैन्याचे हे अभिनव आहे. ही विमाने एकूण ९ हजार ५०० किमीचा प्रवास करतील. या अभियानाच्या माध्यमातून साहस व सांघिक कामाचे प्रदर्शन होणार आहे. हे अभियान देशाच्या प्रादेशिक विविधता आणि सुंदरतेचे प्रतीक असल्याचे कर्नल मनकंवल जीत यांनी सांगितले.

अमरावती येथून आगमन
या अभियानात ही विमाने ३७ ठिकाणी थांबणार असून, ३७ दिवसांचा प्रवास करणार आहेत. अभियान महुपासून सुरू झाले असून, आज या विमानांचे अमरावती येथून नांदेड विमानतळावर आगमन झाले. उद्या ही विमाने बीदरकडे प्रस्थान करणार असल्याचे भारतीय सैन्याचे कर्नल मनकंवल जीत यांनी सांगितले.

Web Title: Four small planes landed at Nanded airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.