दीक्षाभूमीकडे जाणा-या हदगाव येथील धम्म अनुयायांच्या जीपला अपघात, ४ जण ठार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 06:50 PM2017-09-30T18:50:52+5:302017-09-30T18:51:11+5:30

धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला जाणा-या १० धम्म अनुयायांच्या जीपचा ट्रव्हल सोबत  भीषण अपघात झाला. वर्धा पासून जवळ देवळी मार्गावरील सेलसुरा येथे ह अपघात झाला.

Four people died in an accident in the Jeep from Hadgaon, going to Dikshitbha Bhumi | दीक्षाभूमीकडे जाणा-या हदगाव येथील धम्म अनुयायांच्या जीपला अपघात, ४ जण ठार 

दीक्षाभूमीकडे जाणा-या हदगाव येथील धम्म अनुयायांच्या जीपला अपघात, ४ जण ठार 

googlenewsNext

हदगाव ( नांदेड ), दि. 30 : धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमीला जाणा-या १० धम्म अनुयायांच्या जीपचा ट्रव्हल सोबत  भीषण अपघात झाला. वर्धा पासून जवळ देवळी मार्गावरील सेलसुरा येथे ह अपघात झाला. या भीषण अपघातात हदगाव येथील चार जणांचा जागीच मृयू झाला तर २  जण गंभीर जखमी झाले.

हदगाव तहसिल कार्यालयात पेशकार म्हणुन कार्यरत असलेले विठ्ठल खडसे व त्यांचे मिञ मिंलिद खंदारे यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपुरला साजरा करण्याचे ठरवले. यानुसार जवळच्या मित्रांना सोबत घेत त्यांनी जाण्याचे सर्व नियोजन केले. गावातीलच जीप मध्ये (एमएच -26- व्ही  -6031) रात्री 8:00 वाजता ते नागपूरला रवाना झाले. नागपूरच्या दिशेने जात असतानाच प्रवासादरम्यान २ वाजता देवळी मार्गावरील सेलसुरा जवळ एका ट्रव्हलने या गाडीला जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात विठ्ठल खडसे(हदगाव),शिवाजी ढगे (गोजेगाव),दिलीप खंदारे व आरविंद खंदारे  (साप्ती) हे जागीच ठार झाले तर अन्य दोघे जखमी आहेत.या प्रकरणी देवळी पोलीस स्टेशनमध्ये ट्रव्हल चालक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Four people died in an accident in the Jeep from Hadgaon, going to Dikshitbha Bhumi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.