विद्युत रोहित्रासाठी हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतले कोंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:52 AM2018-10-04T00:52:55+5:302018-10-04T00:53:20+5:30

हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव येथील शेतक-यांनी विद्युत रोहित्रासाठी भोकरमध्ये असलेल्या विद्युत वितरण विभागीय कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत समस्येचे तात्पुरते निवारण झाल्यामुळे वीज वितरण विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

The farmers of Himayatnagar taluka took electricity for Rohit's electricity | विद्युत रोहित्रासाठी हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतले कोंडून

विद्युत रोहित्रासाठी हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतले कोंडून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकर : हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव येथील शेतकऱ्यांनी विद्युत रोहित्रासाठी भोकरमध्ये असलेल्या विद्युत वितरण विभागीय कार्यालयात स्वत:ला कोंडून घेतल्यानंतर अवघ्या दोन तासांत समस्येचे तात्पुरते निवारण झाल्यामुळे वीज वितरण विभागाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
मागील महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त होत असताना शेतकऱ्यांना विंधन विहिरीवर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र अनेक ठिकाणचे विद्युत रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. यातच हिमायतनगर तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून जवळपास ३० विद्युत रोहित्र बंद अवस्थेत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी व प्रहार जनशक्ती पक्षाने वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना मागणी घातली होती. परंतु प्रत्येकवेळी अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करुन वेळ मारुन नेली. यातच हिमायतनगर तालुक्यातील खैरगाव, करंजी येथील शेतकऱ्यांनी अभियंता यांच्या सांगण्यानुसार बिल भरले. यानंतर प्रतीक्षा यादीप्रमाणे रोहित्र बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. खैरगावच्या क्रमांकापुढील गावांना रोहित्र देवून यांना ताटकळत ठेवले होते. याबाबत प्रत्येकवेळी विद्युत विभागाने दोन - तीन दिवसांचा अवधी देत महिना घालविला.
यास कंटाळून बुधवारी सकाळपासून १२ शेतकऱ्यांनी भोकर येथील विद्युत वितरणच्या कार्यालयात तळ ठोकला. अखेर दुपारी सर्वजणांनी स्वत:ला कार्यालयातच कोंडून घेतले. दरम्यान, विद्युत विभागाचा एकही जबाबदार अधिकारी येथे हजर नव्हता हे विशेष. अखेर येथील पो.नि. आर.एस.पडवळ, पो.उपनि. सुरेश भाले, जमादार उमेश कारामुंगे यांनी पुढाकार घेवून आंदोलकांना शांत केले व खोलीच्या बाहेर काढल्याने तणाव निवळला.
यावेळी शेतकऱ्यांना त्वरित एक विद्युत रोहित्र मिळाले. कोंडून घेतलेल्या आंदोलकांत प्रहारचे तालुकाध्यक्ष गजानन ठाकरे, प्रभाकर जाधव, रावसाहेब काकडे, खंडू येणेकर, मारोती पवळे, विश्वनाथ गजभरे, दीपक सावंत, दत्तराम टोमके आदीसह १२ जणांचा यावेळी समावेश होता.
 

प्रहारचे आंदोलन चालूच राहणार
विभागीय वीज वितरणमध्ये चालू असलेल्या अनागोंदी कारभाराविरुद्ध प्रहारकडून आंदोलन चालूच राहणार आहे. सकाळपासून आम्ही येथे असताना डी.पी. मिळाला नाही़ परंतु कोंडून घेताच दोन तासांत डीपी आला कोठून ?
- गजानन ठाकरे, तालुकाध्यक्ष प्रहार संघटना, हिमायतनगर.

Web Title: The farmers of Himayatnagar taluka took electricity for Rohit's electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.