जलवाहिनीच्या कामामुळे नांदेडात निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 01:02 AM2019-01-24T01:02:09+5:302019-01-24T01:02:52+5:30

शहरातील काबरानगर जलशुद्धीकरण केंद्र ते देगलूर नाका दरम्यान मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे़ त्यामुळे बुधवारी १२ भागांमध्ये निर्जळी होती़ गुरुवारीही हे काम सुरु राहणार असल्यामुळे गुरुवारीही पाणीपुरवठा करण्यात येणार नाही़

Due to the work of the water channel, Nihar | जलवाहिनीच्या कामामुळे नांदेडात निर्जळी

जलवाहिनीच्या कामामुळे नांदेडात निर्जळी

googlenewsNext

नांदेड : शहरातील काबरानगर जलशुद्धीकरण केंद्र ते देगलूर नाका दरम्यान मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे़ त्यामुळे बुधवारी १२ भागांमध्ये निर्जळी होती़ गुरुवारीही हे काम सुरु राहणार असल्यामुळे गुरुवारीही पाणीपुरवठा करण्यात येणार नाही़
काबरा नगर जलशुद्धीकरण केंद्रावरुन जाणाऱ्या जलवाहिनीला गळती लागली होती़ या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवारी ३५ दलघमीच्या काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रावरुन होणाºया काही भागांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता़ त्यामध्ये राममंदिर, लेबर कॉलनी, आंबेडकरनगर, नाना-नानी पार्क, गोकुळनगर, नंदीग्राम सोसायटी, ३४ क्रमांक साईट, यात्री निवास, शक्तीनगर, हैदरबाग, टेचींग ग्राऊंड व बोंढार या जलकुंभांना होणारा पाणीपुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला होता़ गुरुवारीही जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरु राहणार असून त्यामुळे या भागातील जलकुंभांना गुरुवारीही निर्जळीचा सामना करावा लागणार आहे़ दुरुस्तीच्या कामानंतर नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़

Web Title: Due to the work of the water channel, Nihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.