दुष्काळात चारा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:45 AM2019-03-11T00:45:57+5:302019-03-11T00:46:38+5:30

तालुक्यातील १९ गावांतील ९२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत दुग्धवाढीसाठीच्या विशेष प्रकल्पाच्या सहाय्याने ६५ एकरवर चारा लागवड केली आहे. ऐन दुष्काळात पशुधनाला मोठा आधार मिळाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुमारे ५०० पेक्षा अधिक पशुधन भटकंतीला लगाम बसला आहे.

Drought provides fodder | दुष्काळात चारा उपलब्ध

दुष्काळात चारा उपलब्ध

Next
ठळक मुद्दे६५ एकरवर चारा लागवड, पशुधनाला मिळाला आधार

गंगाधर तोगरे।
कंधार : तालुक्यातील १९ गावांतील ९२ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत दुग्धवाढीसाठीच्या विशेष प्रकल्पाच्या सहाय्याने ६५ एकरवर चारा लागवड केली आहे. ऐन दुष्काळात पशुधनाला मोठा आधार मिळाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुमारे ५०० पेक्षा अधिक पशुधन भटकंतीला लगाम बसला आहे.
कंधार तालुक्यात गत काही वर्षांत शेतकरी व नागरिक अत्यल्प पर्जन्यमानामुळे दुष्काळाचा सामना करत आहेत. पाणी व चाराटंचाईचा प्रश्न किचकट बनला आहे. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, यादृष्टीने राष्ट्रीय कृषी योजनेतंर्गत मराठवाडा व विदर्भात दुग्धवाढीसाठी विशेष प्रकल्प राबविला जात आहे. एन.डी.डी.बी.अंतर्गत बहुवर्षीय चारा लागवड २०१७-१८ अंतर्गत कंधार तालुक्यात ७५ गावांची निवड करण्यात आली. पाणी उपलब्ध असलेल्या गावात, डेअरीला दूध पाठवत असलेल्या पशुपालकांसाठी योजना अंमलबजावणी करण्यावर यंत्रणा गतिमान झाली.
२०१७-१८ मध्ये शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले. ७५ गावांत या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. इतर पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत गावात वंध्यत्व शिबीर, गोचीड व गोमाशा निर्मूलन शिबीर घेण्यात आले. तर गोणार, चिखली, चिंचोली व कुरूळा हे ४ पशुवैद्यकीय दवाखाने व ता. लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, कंधार याअंतर्गत असलेल्या १९ गावांत ९२ शेतकºयांना डी.एच.एन.६ नावाचे ३ लाख १२ हजार चारा लागवड ढोंबे वाटप सप्टेंबर-आॅक्टोबर २०१८ मध्ये मोफत करण्यात आले. एकरी ४ हजार ८०० व १० गुंठ्याला १२०० या प्रमाणात वाटप झाले.१०० टक्के अनुदान यासाठी आहे.
१९ गावांत चारा लागवड ९२ लाभार्थ्यांनी ६५ एकरवर केली आहे. एक एकरचे ४० लाभार्थी, २० गुंठ्याचे ४८ आणि १० गुंठ्याचे ४ लाभार्थी असल्याचे समजते. १०० टक्के अनुदानाची चारा लागवड असली तरी शेतकºयांनी पदरमोड करून ती केली आहे. चार महिने उलटले आहेत.परंतु, लागवड खर्च अद्याप अनुदान स्वरूपात मिळाला नाही. एकरी ७ हजार २०० रुपये, २० गुंठ्याला ३ हजार ६०० व १० गुंठ्याला १ हजार ८०० अनुदान आहे. परंतु, अनुदान अद्याप मिळाले नाही.
जवळपास ४ वर्षे टिकणारा हा चारा पशुधनाला आधार ठरत आहे. याची योग्य निगराणी, योग्य कापणी करणे गरजेचे आहे. बेणे म्हणून याचा वापर करता येतो. एका एकरमधील चारा ७ ते ८ पशुधनाला पुरेल असा असतो. त्यामुळे या ६५ एकरवर ५०० पेक्षा अधिक पशुधन जगत आहे. आणि शेतकºयांना दुधातून उत्पन्न देत आहे. त्यामुळे पशुधनाला दुष्काळात मोठी पर्वणी ठरत आहे. तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार पं.स.) एस. एल. खुणे, पशुधन पर्यवेक्षक पी.एम. घुटे, डी. एन. केंद्रे आदी अधिकारी, कर्मचारी यांनी योजना अंमलबजावणीसाठी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Drought provides fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.