नामफलकाचा वाद निकाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:23 AM2018-03-20T00:23:56+5:302018-03-20T00:23:56+5:30

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा वाद १७ मार्च रोजी झालेल्या चर्चेअंती निकाली निघण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सोनापीर बाबा दर्गाहचे मुजावर फकीर महमंद यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते.

Did you resolve the complaint? | नामफलकाचा वाद निकाली?

नामफलकाचा वाद निकाली?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा वाद १७ मार्च रोजी झालेल्या चर्चेअंती निकाली निघण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सोनापीर बाबा दर्गाहचे मुजावर फकीर महमंद यांच्या नेतृत्वाखाली पालिकेसमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते.
शिवप्रेमी नागरिकांनी नामफलक त्याच जागी लावा, अशी मागणी करुन २१ मार्च रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या मागणीच्या अनुषंगाने निरधारी जाधव, विशाल शिंदे पाटील, आशीष चारभाई, विकास कपाटे, विजय आराध्ये, सुरेश आराध्ये, विनोद सूर्यवंशी, जितू चोले, संदीप गोरडे, गणेश जाधव यांनी मौनवृत्त आंदोलन सुरु केले. तसेच विश्वनाथ पाटील, अंकुश बाळसकर यांनी २१ मार्च रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने वाद चिघळत असल्याचे पाहून सोनापीर दर्गाहचे मुजावर फकीर सादीक यांच्या नेतृत्वाखाली पं.स.चे माजी सभपाती वसंत कपाटे, सय्यद सादीक किरमाणी, नितीन तोडसाम, राजू दराडे, राम दातीर, कार्तिक बेहरे, संजय सुरोशे, संजय पेंदोर, मोरेश्वर वाठोडकर, संजय बनसोड यांनी पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.
यावेळी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक रहेमत अली यांनी चर्चेत भाग घेवून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात चर्चा करुन प्रकरण निकाली काढण्याचे ठरले.
आंदोलनस्थळी नंदकुमार संतान, निरधारी जाधव, गजानन भारती, राज ठाकूर, रुपेश दीक्षित, सुनील गुप्ता, राम कोंडे, बळीराम परसवाळे, जगदीश वडसकर, उमेश चौहाण, संजय उकंडे, अजय पेंदोर, गजानन पळसकर, शामराव बोधनकर, पांडू टेकाम उपस्थित होते. यावेळी सचिन नाईक, विनायक देशमुख व सचिन राठोड यांनीही भेट दिली. जमादार प्रभाकर कर्डेवार, बंडू जाधव आदींनी बंदोबस्त ठेवला होता.

तत्कालीन ग्रामपंचायतने घेतला ठराव
तत्कालीन माहूर ग्रामपंचायतने ३ नोव्हेंबर २०११ रोजी घेतलेल्या ठराव क्रमांक ८ अनुसार मुख्य बाजारातील चौकाचे छत्रपती शिवाजी चौक, असे नामकरण केल्याचा ठराव संमत केला होता. त्यानुसार शासकीय, खाजगी स्तरावर या चौकाचा उल्लेख शिवाजी चौक म्हणून सुरु झाला. मात्र दोन महिन्यांपूर्वी काही मंडळींनी या चौकात नामफलक लावण्यास विरोध केल्याने वाद चिघळला.

Web Title: Did you resolve the complaint?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.