आक्षेपार्ह विधान प्रकरणी केशव धोंडगेंवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:54 AM2018-10-25T00:54:41+5:302018-10-25T00:55:52+5:30

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी खासदार केशवराव धोंडगे यांचा बुधवारी जिल्हाभरात आंबेडकरी कार्यकर्त्यांसह विविध संस्था, संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. लोहा येथे धोंडगेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात धोंडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबरोबरच धोंडगेविरोधात सुरेश गायकवाड आणि प्रा. राजू सोनसळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. तर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी धोंडगे यांना अटक करण्याची मागणी केली.

Case against Keshav Dhondungen in offensive statement | आक्षेपार्ह विधान प्रकरणी केशव धोंडगेंवर गुन्हा

आक्षेपार्ह विधान प्रकरणी केशव धोंडगेंवर गुन्हा

Next
ठळक मुद्देलोह्यात प्रतीकात्मक पुतळा जाळलानांदेडात पडसाद, सिडकोतही निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी खासदार केशवराव धोंडगे यांचा बुधवारी जिल्हाभरात आंबेडकरी कार्यकर्त्यांसह विविध संस्था, संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. लोहा येथे धोंडगेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी कंधार पोलीस ठाण्यात धोंडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबरोबरच धोंडगेविरोधात सुरेश गायकवाड आणि प्रा. राजू सोनसळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. तर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी धोंडगे यांना अटक करण्याची मागणी केली.
कंधार येथील लॉ कॉलेजमधील एका कार्यक्रमात बुधवारी धोंडगे यांनी डॉ. आंबेडकरांच्या घटना निर्मितीतील योगदानाबद्दल आक्षेपार्ह विधान केले. हे विधान सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आले. त्यानंतर सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी धोंडगेंच्या वक्तव्याचा निषेध केला. सोशल मीडियावरही धोंडगे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड आणि भारिपचे प्रा. राजू सोनसळे यांनी माजी खा. धोंडगे यांच्यावर घटनाकारांच्या अवमानप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढणारे माजी खा. केशवराव धोंडगे यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येवून त्यांना अटक करण्याची मागणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
यासंदर्भात सदावर्ते यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक (पीसीआर आणि अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) यांची मुंबईत भेट घेवून त्यांचे धोंडगे यांनी केलेल्या वक्तव्याकडे लक्ष वेधले. यावेळी सदावर्ते म्हणाले, धोंडगे यांना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टच्या कलम १८ ब खाली अटक व्हायला हवी, पोलिसांनी याप्रकरणात वेळकाढूपणा करु नये. कायद्याचा जोर असावा तसेच धोंडगे यांच्या वक्तव्यावरुन काही घडले तर प्रशासन आणि धोंडगे जबाबदार राहतील, असे सांगितले. त्यावर कैसर खालिद यांनी कारवाई केली जाईल, असा शब्द दिला.
लोह्यात चारशे-पाचशे जणांच्या समूहाने तहसीलदार व पोलिसांना कारवाईचे निवेदन दिले. शहराच्या भाजीमंडईत धोंडगे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. नगरसेवक बबन निर्मले, गंगाधर महाबळे, छत्रपती धूतमल, रत्नाकर महाबळे, एम. आर. कापुरे, हरिभाऊ जोंधळे यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. बुधवारी लोह्याच्या क्रांतिसूर्य बुद्धविहारात आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार अशोक मोकले व पो.नि.मोहिते यांना निवेदन देण्यात आले.
माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धूतमल, नगरसेवक बबन निर्मले, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष एस.एन.शिनगारपुतळे, सरचिटणीस रत्नाकर महाबळे, बालाजी खिल्लारे, गंगाधर महाबळे, पंचशील कांबळे, डी.एन.कांबळे, उत्तम महाबळे, भारिपचे अध्यक्ष हरिभाऊ जोंधळे, रिपाइं जिल्हा प्रवक्ते बालाजी धनसडे, सुरेश महाबळे, ज्ञानोबा हनवते, एम. आर. कापुरे सतीश निखाते, शिवराज दाढेल आदींची उपस्थिती होती.
धोंडगे यांच्या वक्तव्याचे पडसाद नांदेड शहरातही उमटले. सिडको परिसरात केशव धोंडगे यांच्या वक्तव्याचा निषेध करत कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने केली. धोंडगे यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी रमाई चौकात राजू लांडगे, विठ्ठल गायकवाड, संदीप गायकवाड, जगदीश भुरे, संदीप सोनकांबळे, संजय निळेकर, अनिल बेरजे आदींनी निदर्शने केली. तसेच धोंडगेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
कार्यकर्ते ठिकठिकाणी उतरले रस्त्यावर
हा व्हिडीओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर लोहा-कंधार-नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेत संतापाची लाट उसळली. नामांतर लढ्यातील धोंडगे यांचा विरोध सर्वश्रुत होता. त्यात हे आक्षेपार्ह विधान आल्याने आंबेडकरी कार्यकर्त्यांबरोबरच इतरांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याबरोबरच कार्यकर्ते रस्त्यावरही उतरले.
भाई धोंडगे यांचा बिनशर्त माफीनामा
केशव धोंडगे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा नांदेडसह राज्यभरातील सर्वच स्तरांतून व्यक्त होऊ लागल्यानंतर माजी खा.केशव धोंडगे यांनी आपला माफीनाफा सोशल मीडियावर टाकला. सदर वक्तव्य अनावधानाने निघाले असल्याचे सांगत या वक्तव्याबाबत डॉ. आंबेडकरांच्या चरणी बिनशर्त माफी मागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Case against Keshav Dhondungen in offensive statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.