दंश केलेला कोब्रा घेवून 'तो' १० किमीचा प्रवास करत आला रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 06:21 PM2019-07-03T18:21:30+5:302019-07-03T18:24:12+5:30

कोब्रासह दहा किमीचा केला प्रवास

After taking a bitten cobra, he traveled 10 km to the hospital | दंश केलेला कोब्रा घेवून 'तो' १० किमीचा प्रवास करत आला रुग्णालयात

दंश केलेला कोब्रा घेवून 'तो' १० किमीचा प्रवास करत आला रुग्णालयात

Next
ठळक मुद्देतरुण मित्रांसह वाळूवर बसलेला असताना कोब्राचा दंश जोपर्यंत बेशुद्ध पडत नाही़ तोपर्यंत त्याने हातातील साप सोडला नाही

बिलोली (नांदेड ) : साप म्हटले भल्याभल्यांच्या अंगावर भितीने काटा उभा राहतो़ त्यात कोब्रासारख्या अतिविषारी सापाचा दंश झाल्यानंतर तर अनेकांचा केवळ भितीपोटीच मृत्यू होतो़ परंतु बिलोली तालुक्यातील माचनूर येथे एका तरुणाला सर्पदंश झाल्यानंतर तोच साप पकडून तब्बल दहा किमीचे अंतर पार करीत रुग्णालय गाठले़ या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला नांदेडला हलविण्यात आले़

तालुक्यातील माचनुर रेतीघाटांवर कामावर असलेल्या बिलोली येथील बालाजी विठ्ठल पांचाळ (२५) हा आपल्या इतर दोन मित्रांसह वाळूवर बसलेला होता़ त्याचवेळी बालाजीला कोब्रा जातीच्या सापाने चावा घेतला़ साप चावा घेवून दुसऱ्या दिशेने पळत असताना बालाजी याने त्याच अवस्थेत त्याचा पाठलाग करुन पकडले़ बालाजीच्या हातात जीवंत साप पाहून सोबतच्या दोन मित्रांची बोबडी वळाली होती़ परंतु बालाजी याने मित्राला आपली दुचाकी घेवून रुग्णालयात चालण्यास सांगितले़ त्यानंतर बालाजीचा मित्र दुचाकी चालवित असताना तो स्वताहा मात्र पाठीमागे जीवंत साप घेवून बसलेला होता़ माचनूर ते बिलोली रुग्णालय असे दहा किलोमीटरचे अंतर बालाजीने जीवंत सापासह पूर्ण केले़ रुग्णालयात आल्यानंतरही जोपर्यंत बेशुद्ध पडत नाही़ तोपर्यंत त्याने हातातील साप सोडला नाही़ या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी नंतर सापाला ठेचून मारले़. रुग्णालयात वैद्यकिय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी प्राथमिक उपचार केले़ परंतु प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे़ 

बालाजीच्या मित्रांचा रुग्णालयात राडा
बालाजी याला उपचारासाठी घेवून आलेल्या एका मित्राने रुग्णालयात येताच राडा केला़ आमच्या रुग्णाला अगोदर उपचार मिळाले पाहिजे असे म्हणत पट्टयाने एका रुग्णाला मारहाण केली़ ही माहिती मिळताच पोलिसांनी राडा घालणाऱ्याची यथेच्छ धुलाई केली़ 

Web Title: After taking a bitten cobra, he traveled 10 km to the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.