४१ उमेदवारांची रणांगणातून माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:09 AM2019-03-30T00:09:31+5:302019-03-30T00:13:33+5:30

नांदेड लोकसभेसाठी १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. ५५ उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी १० तर दुसऱ्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

41 candidates withdrew from the battlefield | ४१ उमेदवारांची रणांगणातून माघार

४१ उमेदवारांची रणांगणातून माघार

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती मतदानासाठी लागणार एकच इलेक्ट्रॉनिक मशीन

नांदेड : नांदेड लोकसभेसाठी १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. ५५ उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी १० तर दुसऱ्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. उमेदवारांची संख्या १५ पेक्षा अधिक नसल्याने मतदानासाठी आता एकच इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार हा अंतिम दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत ३१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. २८ मार्च रोजी १० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. नांदेड लोकसभेसाठी एकूण ५९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील चार उमेदवारांचे अर्ज छाननीत अपात्र ठरले. ५५ पैकी ३१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघार घेतलेल्या उमेदवारांत अहमद अ. खादर नईम, आरीफ अहेमद, एकबाल अहमद, जुल्फेखान जिलानी सय्यद, तुकाराम बिराजदार, रवींद्र थोरात, आनंद नवघरे, नवीन युनूस खान, प्रकाश घुन्नर, प्रमोदकुमार कामठेकर, अ‍ॅड. मारोतराव हुक्के, मो. मोहिजोद्दीन, राहुल साळवे, लतीफ उल जफर कुरेशी, लतीफखाँ पठाण, विजयमाला गायकवाड, शेख मुनीर, सचिन नवघरे, सय्यद तनवीर, अ‍ॅड. सुभाष जाधव, युसूफखान, लता कांबळे, संभाजी पाटील, विजय कांबळे, अंकुश पाटील, अल्ताफ अहमद, सय्यद मोईन, शिवानंद पांचाळ, श्रीकांत गायकवाड, शेख अफजलोद्दीन आणि पठाण जफर अली खान यांचा समावेश आहे.
इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीनवर १५ उमेदवारांची नावे व एक मत ‘नोटा’ चे असते. १५ पेक्षा अधिक उमेदवार राहिले असते तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक वोटींग मशीन लावाव्या लागल्या असत्या. त्याची आता गरज उरणार नाही.एकाच मशीनवर मतदान घेता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डोंगरे म्हणाले.
याच पत्रकार परिषदेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या माहिती संदर्भिकेचे प्रकाशन निवडणूक निरीक्षक हरदीपसिंघ व निवडणूक निर्णय अधिकारी डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर संदर्भिका अभ्यासकांना तसेच प्रसार माध्यमांना विश्लेषणासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास डोंगरे यांनी व्यक्त केला. या संदर्भिकेत निवडणूक आचारसंहिता, सोशल मीडिया, व्हीव्हीपॅट, मतदान केंद्र संख्या तसेच लोकसभा निवडणुकीतील १९५१ ते २०१४ पर्यंतचे निकाल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, राम गगराणी, लतीफ पठाण, राजेंद्र चव्हाण, डॉ. दीपक शिंदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: 41 candidates withdrew from the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.