मैत्रिणीच्या पार्टीत तरुणाला मारहाण : तिघांना अटक, तलवारही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:10 AM2019-06-04T00:10:59+5:302019-06-04T00:11:34+5:30

मैत्रिणीच्या पार्टीत सहभागी झालेल्या संदीप गेंदलाल यादव (वय ३२, रा. यादवनगर, गवळीपुरा, कामठी) या तरुणाला पार्टीतील तिघांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. कामठी मार्गावरील ड्युक्स बार आणि रेस्टॉरंटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.

The youth assaulted a girl friend's party: Three arrested and swords seized | मैत्रिणीच्या पार्टीत तरुणाला मारहाण : तिघांना अटक, तलवारही जप्त

मैत्रिणीच्या पार्टीत तरुणाला मारहाण : तिघांना अटक, तलवारही जप्त

Next
ठळक मुद्दे जरीपटक्यात घडला गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मैत्रिणीच्या पार्टीत सहभागी झालेल्या संदीप गेंदलाल यादव (वय ३२, रा. यादवनगर, गवळीपुरा, कामठी) या तरुणाला पार्टीतील तिघांनी बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. कामठी मार्गावरील ड्युक्स बार आणि रेस्टॉरंटमध्ये रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.
संदीपच्या मैत्रिणीने कामठी मार्गावरील ड्युक्स बार आणि रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री एक पार्टी आयोजित केली होती. त्यात तो सहभागी झाला. तेथे असलेल्या सुखचैनसिंग सुखवेंदरसिंग सिन्हा (वय २७, रा. बाबादीपसिंग नगर) आणि रोहित कुलदीप शर्मा (वय ३२, रा. बाबादीपसिंग नगर) या दोघांसोबत संदीपचा वाद झाला. पाहता पाहता आरोपींनी संदीपवर लाकडी दांड्याने हल्ला चढवला. त्याच्या पायावर जबर फटके हाणून त्याला दुखापत केल्यामुळे संदीपचे मित्र मदतीला धावले असता आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. संदीपने हा प्रकार अमित ऊर्फ चिन्नू कुलदीप शर्मा याला फोन करून सांगितला असता चिन्नूनेही संदीपला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे पार्टीत एकच गोंधळ निर्माण झाला. माहिती कळताच जरीपटका पोलीस तेथे पोहचले. त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. चिन्नू शर्माच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात पोलिसांना एक तलवार मिळाली. पोलिसांनी आरोपी सिन्हा आणि शर्मा बंधूला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

Web Title: The youth assaulted a girl friend's party: Three arrested and swords seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.