भाऊबीजेच्या दिवशी भावाने सोडले जग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 11:40 PM2018-11-09T23:40:44+5:302018-11-09T23:43:42+5:30

सावनेर शहराला अपघाताचे ग्रहण लागले की काय, असे वाटायला लागले आहे. कारण, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (बुधवार, दि. ७) सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला. त्यातच भाऊबीजेच्या दिवशी (शुक्रवार, दि. ९) रात्री सावनेर शहरात झालेल्या अपघातात ओवाळणीपूर्वीच भावाला जग सोडावे लागले. विशेष म्हणजे, भाऊ काम आटोपून त्याच्या मित्रासोबत घरी जात असतानाच मेटॅडोरने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना तेलगाव शिवारात रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.

The world has left the brother on the occasion of Bhaubij | भाऊबीजेच्या दिवशी भावाने सोडले जग

भाऊबीजेच्या दिवशी भावाने सोडले जग

Next
ठळक मुद्देअपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी : मेटॅडोरची दुचाकीला धडकनागपूर जिल्ह्याच्या सावनेर येथील दुर्दैवी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (सावनेर) : सावनेर शहराला अपघाताचे ग्रहण लागले की काय, असे वाटायला लागले आहे. कारण, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (बुधवार, दि. ७) सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला. त्यातच भाऊबीजेच्या दिवशी (शुक्रवार, दि. ९) रात्री सावनेर शहरात झालेल्या अपघातात ओवाळणीपूर्वीच भावाला जग सोडावे लागले. विशेष म्हणजे, भाऊ काम आटोपून त्याच्या मित्रासोबत घरी जात असतानाच मेटॅडोरने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना तेलगाव शिवारात रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली.
नितीन रवींद्र बोरकर (२२) असे दुर्दैवी मृत भावाचे नाव असून, शुभम दिलीप गजभिये (२०), दोघेही रा. तिष्टी (खुर्द), ता. सावनेर असे गंभीर जखमीचे नाव आहे. नितीनने काही दिवसांपूर्वीच महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने कामाला सुरुवात केली होती. तो रोज सावनेरहून तिष्टी (खुर्द)ला मोटरसायकलने ये-जा करायचा. आज (दि. ९) भाऊबीज असल्याने तसेच त्याची मोठी बहीण ओवाळणीसाठी घरी प्रतीक्षा करीत असल्याने तो रात्री ७ वाजताच्या सुमारास शुभमसोबत मोटरसायकलने गावाला जायला निघाला. ते तेलगावजवळ पोहोचताच विरुद्ध दिशेने वेगात येणाऱ्या एमएच-३१/एफसी-२६१५ क्रमांकाच्या मेटॅडोरने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.
त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. मात्र, नितीनचा काही वेळात घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी लगेच पोलिसांना सूचना देत दोघांनाही सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणले. तिथे शुभमवर प्रथमोपचार करून त्याला नागपूरला उपचारासाठी रवाना करण्यात आले. या घटनेमुळे तिष्टी (खुर्द) येथे शोककळा पसरली. या प्रकरणी केळवद (ता. सावनेर) पोलिसांनी मेटॅडोरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Web Title: The world has left the brother on the occasion of Bhaubij

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.