विधानभवनाचा मेकओव्हर : रेनप्रुफ मॅनेजमेंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:53 PM2018-07-07T22:53:33+5:302018-07-07T23:03:09+5:30

विधानभवनात पाणी साचून विजेचे संकट ओढवल्याने विधिमंडळाचे कामकाज बंद पडले आणि प्रशासनाला जाग आली. विधान भवनातील स्विचेस सेंटरमध्ये पाणी घुसू नये म्हणून ततडीने सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. शनिवारी युद्धस्तरावर साफसफाईचे काम सुरू करण्यात आले, परंतु हेच काम अगोदर झाले असते तर शहराची बदनामी झाली नसती.

Vidhan Bhavan's makeover: Rainproof management | विधानभवनाचा मेकओव्हर : रेनप्रुफ मॅनेजमेंट

विधानभवनाचा मेकओव्हर : रेनप्रुफ मॅनेजमेंट

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्यापासून वाचवण्यासाठी युद्धस्तरावर कामबांधली सुरक्षा भिंत, नाल्यांची सफाईआठ जागी लावले पंप


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानभवनात पाणी साचून विजेचे संकट ओढवल्याने विधिमंडळाचे कामकाज बंद पडले आणि प्रशासनाला जाग आली. विधान भवनातील स्विचेस सेंटरमध्ये पाणी घुसू नये म्हणून ततडीने सुरक्षा भिंत उभारण्यात येत आहे. शनिवारी युद्धस्तरावर साफसफाईचे काम सुरू करण्यात आले, परंतु हेच काम अगोदर झाले असते तर शहराची बदनामी झाली नसती.
विधिमंडळाचे कामकाज आता सोमवार ९ जुलै रोजी सुरु होईल. सोमवारी कुठलही गडबड होऊ नये म्हणून सरकारपासून तर प्रशासनापर्यंत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. बैठकीच्या सत्रानंतर आता विधानभवनाला खऱ्या अर्थाने रेनप्रूफ करण्याचे काम सुरू झाले आहे. शनिवारी विधानभवन परिसराची पाहणी केली असता युद्धस्तरावर काम सुरू असल्याचे दिसून आले. विधानभवन परिसरातील स्विचिंग रुममध्ये पाणी जऊ नये म्हणन भिंत बांधली जात आहे. शुक्रवारी याच रुममध्ये पाणी भरल्याने वीज पुरवठा प्रभावित झाला होता. विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही भिंत असल्याचे सांगितले जाते. परंतु पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच ती हटविण्यात आल्याचेही सांगितले जाते. पाणी साचल्याच्या परिस्थितीत ते तातडीने बाहेर काढण्यासाठी विधान भवन परिसरात आठ पंप लावण्यात आले आहेत. यासोबत परिसरातील नाल्यांचीही सफाई करण्यात आली.
नाल्यांमध्ये दारूच्या बॉटल व झाडांच्या फांद्या
विधानभवन परिसरातील नाल्यांची शनिवारी पूर्णपणे सफाई करण्यात आली. प्रत्येक चेंबर उघडण्यात आले. नाल्यांची सफाई करताना पुन्हा दारूच्या बॉटल व झाडांच्या फांद्या सापडल्याचे सांगितले जाते. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्

 

Web Title: Vidhan Bhavan's makeover: Rainproof management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.