नागपूर जिल्ह्यात जनावरांना कोंबून नेणारे वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:16 PM2018-03-08T12:16:40+5:302018-03-08T12:16:49+5:30

कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाणारी भरधाव जीप उलटली. त्यात नऊ गाई जखमी झाल्या. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) शिवारातील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ पहाटेच्या सुमारास घडली.

The vehicle carrying animals in Nagpur district has been reversed | नागपूर जिल्ह्यात जनावरांना कोंबून नेणारे वाहन उलटले

नागपूर जिल्ह्यात जनावरांना कोंबून नेणारे वाहन उलटले

Next
ठळक मुद्देदहेगाव शिवारातील घटनाआरोपी घटनास्थळावरून पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कत्तलखान्यात जनावरांना घेऊन जाणारी भरधाव जीप उलटली. त्यात नऊ गाई जखमी झाल्या. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागपूर - सावनेर मार्गावरील दहेगाव (रंगारी) शिवारातील रिलायन्स पेट्रोलपंपजवळ पहाटेच्या सुमारास घडली. घटनेनंतर चालक तेथून पसार झाला. जखमी गाईंना लगेच गोरक्षण सभेत पाठविण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील कत्तलखान्यात गेल्या अनेक वर्षांपासून चोरट्या मार्गाने जनावरे नेली जातात. असे प्रकार अनेकदा उघडकीस आले. अशा प्रकरणात पोलीस कारवाईही करण्यात आली. मात्र त्यानंतर हा प्रकार सुरूच असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.
छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथून नऊ गाईंना एमएच-३१/सीक्यू-७५०० क्रमांकाच्या बोलेरो जीपमध्ये कोंबून कत्तलखान्यात नेले जात होते. पहाटेच्या सुमारास दहेगाव (रंगारी) शिवारात बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली. त्यात ती जीप उलटली. त्यामुळे त्यातील सर्व गाई जखमी झाल्या. बराच वेळ त्या घटनास्थळीच पडून होत्या. आरोपी जीपचालक घटनास्थळाहून पसार झाला. याबाबत खापरखेडा पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून सदर गाईंना गोरक्षण सभेत पाठविले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यभान जळते, अर्पित पशिने करीत आहे.

Web Title: The vehicle carrying animals in Nagpur district has been reversed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात