‘शेअर्स ट्रेडिंग’चा ट्रॅप; नागपुरातील गुंतवणूकदारांना २०.९० कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2023 09:53 PM2023-02-06T21:53:41+5:302023-02-06T21:55:13+5:30

Nagpur News शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली नागपूरच्या तीन गुंतवणूकदारांना २०.९० कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

Trap of 'shares trading', 20.90 crores to investors in Nagpur | ‘शेअर्स ट्रेडिंग’चा ट्रॅप; नागपुरातील गुंतवणूकदारांना २०.९० कोटींचा गंडा

‘शेअर्स ट्रेडिंग’चा ट्रॅप; नागपुरातील गुंतवणूकदारांना २०.९० कोटींचा गंडा

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईतील कंपनीच्या संचालकांकडून शेअर्सची परस्पर विक्रीमुंबईत गुन्हा दाखल, ‘ईओडब्ल्यू’कडून चौकशीला सुरुवात

 

नागपूर : शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवून देण्याच्या नावाखाली नागपूरच्या तीन गुंतवणूकदारांना २०.९० कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना न सांगता संबंधित कंपनीच्या तीन संचालकांनी परस्पर शेअर्सची विक्री करत त्याची रक्कम स्वत:कडेच ठेवली. या प्रकारामुळे गुंतवणूकदारांच्या नेटवर्कमध्ये खळबळ उडाली असून, संबंधित कंपनीच्या इतर गुंतवणूकदारांकडून वारंवार विचारणा होत आहे. या प्रकरणात मुंबईच्या जुहू पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

जे. एन. एम. रिॲलिटी अँड मार्केटिंग असे संबंधित कंपनीचे नाव असून एसव्ही रोड, विलेपार्ले पश्चिम येथील रहिवासी जस्मिन शहा, दीपिका जस्मिन शहा व विशाल शहा या आरोपींनी हा गंडा घातला आहे. नागपुरातील व्यावसायिक व सिल्व्हरस्टोन इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक अभिनव रमाकांत फतेहपुरिया (४०, सिव्हिल लाइन्स), भक्ती इन्व्हेस्टमेंटचे राहुल नवलकिशोर अग्रवाल व फेलाइन फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संचालक राजकुमार नरसिंगदास अग्रवाल यांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची होती. यासाठी त्यांनी मुंबईतील शेअर मार्केट ट्रेडिंग एजन्सीचा शोध सुरू केला. अशोक झवर नामक व्यक्तीने त्यांना जस्मिन शहा याची माहिती दिली. शाहशी तिन्ही गुंतवणूकदारांची चर्चा झाली व त्याने त्यांना पैसे त्याच्या खात्यात वर्ग करायला सांगितले. ठरल्याप्रमाणे सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत फतेहपुरिया यांनी सव्वासात कोटी, राहुल अग्रवाल यांनी अडीच कोटी तर राजकुमार अग्रवाल यांनी ११.१५ कोटी रुपये ट्रान्सफर केले. शाहने एकूण ७५, ५२,२९६ शेअर्स खरेदी केले. त्यातील ४९,९३,९६४ शेअर्सची शाहने परस्पर विक्री केली. त्याची माहिती गुंतवणूकदारांना दिलीच नाही. जेव्हा शेअर्स रजिस्टर तपासले तेव्हा ही बाब समोर आली. शेअर्स विकून आलेली १३ कोटी ३५ लाख तसेच उर्वरित शेअर्सची रक्कम शहाने गुंतवणूकदारांना परत केलीच नाही. अखेर फतेहपुरिया यांनी जुहू पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

मुंबई पोलिसांकडून चौकशीला सुरुवात

जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित प्रकरण हे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. तेथील अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात तपासाला सुरुवात केली असल्याची माहिती जुहू पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजितकुमार वर्तक यांनी दिली.

शेअर्सची माहिती देण्यासदेखील टाळाटाळ

शहा त्रिकुटाने ज्यावेळी शेअर्स घेतले तेव्हा ते कुठल्या कंपनीचे घेतले याची माहिती देण्यासदेखील टाळाटाळ केली. गुंतवणूकदारांच्या ओळखीचे सी.ए.बी.के. अग्रवाल यांनी विचारणा केल्यावर शहाने शेअर्सची माहिती पाठविली. त्याने ४ नोव्हेंबर २०२२ पासून शेअर्सची परस्पर विक्री सुरू केली. याबाबत अग्रवाल यांनी विचारणा केली. मात्र शहाने टाळाटाळ केली व नंतर पूर्ण संपर्कच तोडला.

Web Title: Trap of 'shares trading', 20.90 crores to investors in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.