राज्यात तापमानाचा कहर! पूर्व विदर्भात उष्माघाताचे १३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 03:10 PM2022-05-14T15:10:26+5:302022-05-14T15:14:18+5:30

एकीकडे तापमानाचा भडका उडत असताना दुसरीकडे रुग्ण व मृत्यूच्या वाढत्या संख्येने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

Temperature havoc in Maharashtra! 13 deaths due to heatstroke in East Vidarbha | राज्यात तापमानाचा कहर! पूर्व विदर्भात उष्माघाताचे १३ मृत्यू

राज्यात तापमानाचा कहर! पूर्व विदर्भात उष्माघाताचे १३ मृत्यू

Next

नागपूर : तापमानाचा पारा ४१ अंशांच्यावर गेल्याने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत उष्माघाताचे १३ मृत्यू व ४७५ रुग्णांची नोंद झाली. यात चंद्रपूर जिल्हामध्ये सर्वाधिक ६ मृत्यू व २०४ रुग्ण तर त्या खालोखाल नागपूर जिल्ह्यामध्ये ५ मृत्यू व १४३ रुग्ण आढळून आले आहेत.

विदर्भात उन्हाची भीषण लाट असून, नागपूर, चंद्रपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये सूर्याचा तीव्र प्रकोप पाहायला मिळत आहे. एकीकडे तापमानाचा भडका उडत असताना दुसरीकडे रुग्ण व मृत्यूच्या वाढत्या संख्येने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. पूर्व विदर्भात १ मार्च ते १३ मे यादरम्यान चंद्रपूर शहरात १३ रुग्ण व १ मृत्यू तर चंद्रपूर ग्रामीणमध्ये १९१ रुग्ण व ५ मृत्यूची नोंद झाली. नागपूर शहरात ११४ रुग्ण व ५ मृत्यू तर ग्रामीणमध्ये २९ रुग्ण आढळून आले आहेत. या शिवाय, गोंदिया जिल्ह्यात ६२ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात ४० रुग्ण व १ मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यात २६ रुग्ण व १ मृत्यू तर भंडारा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

-४३ दिवसांत ९८ टक्क्यांनी वाढ

पूर्व विदर्भात १ एप्रिल रोजी उष्माघाताच्या ९ रुग्णांची नोंद असताना ४३ दिवसांत ९८.१० टक्क्यांनी वाढ झाली. विशेष म्हणजे, १६ एप्रिल रोजी ११४ रुग्ण व ४ मृत्यू, २९ एप्रिल रोजी ३२८ रुग्ण व ९ मृत्यू तर १३ मे रोजी ४७५ रुग्ण व १३ मृत्यूची नोंद झाली आहे.

- उष्माघाताचे रुग्ण व मृत्यू

जिल्हा : रुग्ण : मृत्यू

चंद्रपूर (शहर) १३ : १

चंद्रपूर (ग्रामीण) १९१ : ५

नागपूर (शहर) ११४ : ५

नागपूर (ग्रामीण) २९ :००

गोंदिया :६२ :००

वर्धा : ४० : ०१

गडचिरोली : २६ :०१

भंडारा :०० :००

Web Title: Temperature havoc in Maharashtra! 13 deaths due to heatstroke in East Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.