महापारेषणचे सबस्टेशन ठप्प, ७० हजार घरे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 09:55 PM2018-09-26T21:55:04+5:302018-09-26T21:58:05+5:30

शहरातील मोठ्या परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या मानकापूर सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने बुधवारी दुपारी तब्बल ७० हजारापेक्षा अधिक घरांची वीज गेली. सूत्रानुसार चीनमधून आयात करण्यात आलेल्या उपकरणात त्रुटी निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. सध्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने प्रभावित परिसरातील वीज पुरवठा दुसऱ्या सबस्टेशनशी जोडून काम चालवले आहे.

Substation of transmission stopped, 70 thousand houses in the dark | महापारेषणचे सबस्टेशन ठप्प, ७० हजार घरे अंधारात

महापारेषणचे सबस्टेशन ठप्प, ७० हजार घरे अंधारात

googlenewsNext
ठळक मुद्देचीनवरून आयात उपकरणात तांत्रिक त्रुटी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मोठ्या परिसराला वीज पुरवठा करणाऱ्या महापारेषणच्या मानकापूर सब स्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने बुधवारी दुपारी तब्बल ७० हजारापेक्षा अधिक घरांची वीज गेली. सूत्रानुसार चीनमधून आयात करण्यात आलेल्या उपकरणात त्रुटी निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली. सध्या वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने प्रभावित परिसरातील वीज पुरवठा दुसऱ्या सबस्टेशनशी जोडून काम चालवले आहे.
सूत्रानुसार बुधवारी दुपारी १ वाजता मानकापूर येथील १३३ केव्ही क्षमतेच्या सब स्टेशनमधून ३३ केव्ही वीज पुरवठा लाईनमध्ये लागलेले दोन तारांना जोडणारे उपकरण खराब झाले. हे उपकरण सहा महिन्यांपूर्वीच चीनमधून आणले गेले होते. यामुळे एसएनडीएलच्या पाच सब स्टेशनामधील वीज पुरवठा प्रभावित झाला. यामध्ये एमएफओ, एमआरएस, नारा, बिजलीनगर, सेमिनरी हिल्स, गोरेवाडा या परिसराचा समावेश आहे. यासोबतच कामठी रोड, जरीपटकासह उत्तर नागपुरातील बहुतांश भाग, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, बैरामजी टाऊन, वायुसेनानगर आदी प्रभावित झाले. वायुसेनानगरला लगेच दुसऱ्या सब स्टेशनसोबत जोडण्यात आले. परंतु एलेक्सीस हॉस्पिटल, एनएडीटी आणि फायर कॉलेजसारख्या एचटी ग्राहकांनामात्र दुसऱ्या सबस्टेशनशी जोडता आले नाही. तब्बल तीन तासानंतर सेक्शनायजरला हटवून दोन्ही लाईन जोडून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

गोरेवाडा वॉटर वर्क्सही प्रभावित
एसएनडीएलनुसार मानकापूर सब-स्टेशनमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गोरेवाडा येथील वॉटर वर्क्स येथील वीज पुरवठाही प्रभावित झाला. गोधनी येथील वॉटर वर्क्सची वीजही गायब होती. महापारेषणने तांत्रिक बिघाडाची माहिती एसएनडीएलला देण्यासही उशीर केला. १२.५५ ला तांत्रिक बिघाड झाला. परंतु त्याची माहिती एसएनडीएलला १.३० वाजता मिळाली.

Web Title: Substation of transmission stopped, 70 thousand houses in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.