उपराजधानी गारठली : पारा ६.३ अंशांवर घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 09:17 PM2018-12-22T21:17:23+5:302018-12-22T21:30:50+5:30

देशाच्या उत्तर भागातील शीतलहरीचा प्रभाव नागपुरातदेखील जाणवत आहे. केवळ पाच दिवसांत नागपुरातील किमान तापमान ८.७ अंशांनी घसरले आहे. शनिवार तर नागरिकांची परीक्षाच घेणारा ठरला. २४ तासात ६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. गारठ्यामुळे सायंकाळनंतर तर घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले होते. सरासरीहून ६ अंशांनी तापमान कमी असल्यामुळे अतिशीतलहरीची स्थिती निर्माण झाली आहे.

Subcapital become chilled : mercury slumped to 6.3 per cent | उपराजधानी गारठली : पारा ६.३ अंशांवर घसरला

उपराजधानी गारठली : पारा ६.३ अंशांवर घसरला

Next
ठळक मुद्देथंडीचा झाला ‘वार’

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या उत्तर भागातील शीतलहरीचा प्रभाव नागपुरातदेखील जाणवत आहे. केवळ पाच दिवसांत नागपुरातील किमान तापमान ८.७ अंशांनी घसरले आहे. शनिवार तर नागरिकांची परीक्षाच घेणारा ठरला. २४ तासात ६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. गारठ्यामुळे सायंकाळनंतर तर घराबाहेर पडणेदेखील कठीण झाले होते. सरासरीहून ६ अंशांनी तापमान कमी असल्यामुळे अतिशीतलहरीची स्थिती निर्माण झाली आहे.
शुक्रवारी ८.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले होते. मात्र शनिवारी पारा आणखी २ अंशांनी घसरला. शनिवारी कमाल २८ तर किमान ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. वातावरण कोरडे असल्याने व उत्तर भारतात थंडी पडल्याने मध्य भारतातील तापमान घटले आहे. सूर्यास्त झाल्यानंतर रस्त्यांवर थंडीचा प्रभाव जाणवायाला लागतो. रात्री ९ वाजेनंतर तर तुरळक गर्दीच दिसून आली. शिवाय धुक्याचादेखील प्रभाव कायम आहे. दिवसा चांगले ऊन असतानादेखील थंडी जाणवत होती.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भासह मध्य भारतात येत्या ४८ तासांत तापमानात आणखी घट नोंदविल्या जाऊ शकते. त्यामुळे उपराजधानीचा पारा आणखी खाली उतरू शकतो.
विदर्भात नागपूर सर्वात ‘कूल’ 


विदर्भातदेखील थंडीचा कडाका जाणवतो आहे. शनिवारी नागपूरपाठोपाठ यवतमाळ येथे ९ अंश सेल्सिअस, ब्रम्हपुरीत ९.२ अंश सेल्सिअस तर गोंदिया येथे ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. सर्वात जास्त किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस इतके होते व त्याची वाशीम येथे नोंद झाली.
आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान

दिवस                  तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२९ डिसेंबर २०१४      ५.०
२९ डिसेंबर १९६८     ५.५
२८ डिसेंबर १९८३     ५.७
२२ डिसेंबर २०१८      ६.३

सहा दिवसांचे किमान तापमान

दिवस                किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
१७ डिसेंबर              १५.६
१८ डिसेंबर              १५.०
१९ डिसेंबर              ९.६
२० डिसेंबर             ८.६
२१ डिसेंबर             ८.३
२२ डिसेंबर            ६.३

यंदा ‘रेकॉर्ड’ मोडणार का ?
नागपूरमध्ये डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते. चार वर्षाअगोदर २९ डिसेंबर २०१४ रोजी किमान तापमान ५ अंशांवर पोहोचले होते व हा एक ‘रेकॉर्ड’ होता. हा शहरातील सर्वात थंड दिवस ठरला होता. यंदा थंडीचा ‘रेकॉर्ड’ मोडणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. २८ डिसेंबर २०१७ रोजी किमान तापमान ७.७ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. २० डिसेंबर २०१६ रोजी ७.८ अंश सेल्सिअस, २६ डिसेंबर २०१५ रोजी ७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. यंदा तर पारा सरासरीहून ३ ते ४ अंशांनी घसरला आहे.
काय आहे शीतलहर
ज्यावेळी तापमान सरासरीहून पाच अंश किंवा त्याहून कमी होते, तेव्हा त्याला शीतलहरीच्या श्रेणीत ठेवण्यात येते. तर जर पारा सरासरीहून सात किंवा अधिक अंशांनी घसरला तर त्याला अतिशीतलहर मानण्यात येते. सद्यस्थितीत नागपूरचे किमान तापमान ६ अंशांहून खाली गेले आहे. त्यामुळे नागपूरची अतिशीतलहरीकडे वाटचाल होत आहे.

 

Web Title: Subcapital become chilled : mercury slumped to 6.3 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.