नागपूरनजीकच्या हिंगणा मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:46 PM2018-07-21T23:46:39+5:302018-07-21T23:47:24+5:30

नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील प्रस्तावित रिच-३ मध्ये मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे. लोकमान्य नगर मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला आता सुरुवात झाली आहे. तर रचना अपार्टमेंटसमोरील मेट्रो मार्गावर व्हायडक्ट अप अ‍ॅण्ड डाऊन लाईनवर व्हायडक्ट स्टॅण्डर्ड गेजचे कार्य प्रारंभ करण्यात आले आहे.

Start of work of rolling out of Nagpur's Hingana Metro route | नागपूरनजीकच्या हिंगणा मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला प्रारंभ

नागपूरनजीकच्या हिंगणा मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला प्रारंभ

Next
ठळक मुद्देरिच-३ मध्ये स्पॅन, आय गर्डर, सेगमेंटचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील प्रस्तावित रिच-३ मध्ये मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे. लोकमान्य नगर मेट्रो मार्गावर रुळ बसविण्याच्या कार्याला आता सुरुवात झाली आहे. तर रचना अपार्टमेंटसमोरील मेट्रो मार्गावर व्हायडक्ट अप अ‍ॅण्ड डाऊन लाईनवर व्हायडक्ट स्टॅण्डर्ड गेजचे कार्य प्रारंभ करण्यात आले आहे.
सुभाष नगर ते रचना रिंग रोडपर्यंत आय गर्डर बसविण्याचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. यासह डेस्क स्लॅब कास्टिंगचे कार्य पूर्णत्त्वास येत आहे. काही खासगी वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच एमआयडीसी परिसरातील अनेक कारखान्यामुळे रिच-३ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होत असल्यामुळे मेट्रो अधिकाऱ्यांतर्फे आवश्यक त्या उपाययोजना करून स्पॅन, आय गर्डर आणि सेगमेंट बसविण्यात येत आहेत.
रिच-३ मेट्रो मार्गावर एकूण ३४६ पैकी १९६ स्पॅन, १५१ पैकी १०३ आय गर्डर आणि ३५६० पैकी २४३१ सेगमेंट बसविण्याचे कार्य महामेट्रोने पूर्ण केले आहे. या कार्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंत अशा १०.३ कि.मी.च्या या मार्गावर एकूण १० स्टेशन प्रस्तावित आहे.

 

Web Title: Start of work of rolling out of Nagpur's Hingana Metro route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.