भरधाव स्टार बसने घेतला दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:38 AM2017-10-22T01:38:09+5:302017-10-22T01:38:21+5:30

स्टार बस चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका दुचाकीला धडक मारल्यामुळे दुचाकीवर बसलेल्या दोघांचा करुण अंत झाला.

The star-studded bus catches the star of the victim | भरधाव स्टार बसने घेतला दोघांचा बळी

भरधाव स्टार बसने घेतला दोघांचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देचालक गजाआड : संतप्त जमावाची दगडफेक, बस पेटविण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टार बस चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून एका दुचाकीला धडक मारल्यामुळे दुचाकीवर बसलेल्या दोघांचा करुण अंत झाला. कामठी मार्गावरील रेल्वे पुलाजवळ शुक्रवारी रात्री ८ ते ८.३० दरम्यान हा भीषण अपघात घडला. यामुळे घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.
नागपूर-कामठी मार्गावरील उप्पलवाडी येथील राजेंद्र वासुदेवराव राऊत (वय ३४) आणि त्यांचा मित्र कार्तिक रामेश्वर पाटील (वय १९) हे दोघे एमएच ४९/ एएम ६८५० क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. स्टार बस क्रमांक एमएच ३१/सीए ६०१८ चा आरोपी चालक नदीम अहमद अब्दुल रशीद (वय ३६, रा. कामठी) याने निष्काळजीपणे भरधाव वेगात बस चालवून राऊत यांच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने स्टार बसवर दगडफेक केली. काहींनी टायरला आग लावली. अपघातामुळे या मार्गावरची वाहतूकही रखडली. रवींद्र वासुदेव राऊत (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वाहनचालक नदीम अहमदला अटक केली.

उप्पलवाडीत शोककळा
गावातील दोन जीव गेल्यामुळे उप्पलवाडीतील नागरिकांच्या दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले आहे. गावात तीव्र शोककळा पसरली असून, या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: The star-studded bus catches the star of the victim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.