नागपुरात होणार राहणीमान सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 11:28 AM2020-02-05T11:28:09+5:302020-02-05T11:30:22+5:30

नागरी क्षेत्रात नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने राहणीमान सर्वेक्षण (इज ऑफ लिव्हींग इंडेक्स) सुरू करण्यात आले आहे.

Standard survey to be conducted in Nagpur | नागपुरात होणार राहणीमान सर्वेक्षण

नागपुरात होणार राहणीमान सर्वेक्षण

googlenewsNext
ठळक मुद्दे१ ते २९ फेब्रुवारीपर्यंत प्रक्रियानागरिकांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरी क्षेत्रात नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचविण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्यावतीने राहणीमान सर्वेक्षण (इज ऑफ लिव्हींग इंडेक्स) सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शहरातील जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे व नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी केले आहे.
नागपूर शहरात १ ते २९ फेब्रुवारी २०२० दरम्यान सर्वेक्षण सुरू राहील. या सर्वेक्षणासाठी तीन निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये राहण्यास योग्य शहर,महापालिकेचे कामकाज, शहराचे हवामान याबाबत नागरिकांची मते जाणून घेऊन सहभागी शहराचा क्रमांक निश्चित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात देशातील ११४ शहरे सहभागी होत आहेत.
महाराष्ट्रातील १२ शहरे सर्वेक्षणात सहभागी होत आहेत. आपल्या शहराला त्यामध्ये अव्वल मानांकन प्राप्त व्हावे, याकरिता नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व त्यांच्या अपेक्षांची पूर्तता यांची पडताळणी करणे हे या सर्वेक्षणाचे मुख्य उद्दिष्ट केंद्र्र शासनाने निश्चित केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रशासनाचे कामकाज आणि त्याची अंमलबजावणी याबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे हे प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. राहणीमान सर्वेक्षणाव्दारे प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे प्रशासनास, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधाबाबत नागरिकांचे मत जाणून घेणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविण्याची गरज आहे.

लिंक/क्यूआर कोडव्दारे सहभाग नोंदवा
सहा महिन्यापेक्षा जास्त काळ नागपूर शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने राहणीमान सर्वेक्षण २०१९ चा क्यूआर कोड स्कॅन करुन या सर्वेक्षणात सहभाग घ्यावा. सर्वप्रथम eol2019.org/citizenfeedback या संके त स्थळावर जाऊन किं वा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर प्रथम प्रथम महाराष्ट्र राज्य व त्यानंतर नागपूर शहर निवडावे. त्यानंतर नागरिकांनी आपले मत नोंदवावे असे रामनाथ सोनवणे यांनी केले आहे.

Web Title: Standard survey to be conducted in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार