कामशिल्पांचे आध्यात्मिक तत्त्व संशोधनाची गरज : चंद्रकांत चन्ने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:37 PM2019-05-11T23:37:58+5:302019-05-11T23:40:36+5:30

आपल्या देशात मिथून शिल्प किंवा कामशिल्पे असलेली १४ मंदिरे आहेत. त्यातील खजुराहो आणि कोणार्कचे सूर्यमंदिर हे प्रसिद्ध आहेत. खरंतर मंदिराच्या एकूण शिल्पात ही कामशिल्पे २ किंवा ३ टक्के आहेत. भोगवादी व आध्यात्मिक भावनांचा अद्भूत मिलाफ या मंदिराच्या कामशिल्पातून होतो. संसारातून वैराग्याकडे म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे मार्गक्रमण करताना मधले दैनंदिन कामकर्तव्य महत्त्वाची असतात. मात्र त्यातील कामभावनेकडे अधिक लक्ष देण्यात आले. त्यातील आध्यात्मिक तत्त्व आपल्यापर्यंत पोहचलीच नाही. ती त्या रूपाने संशोधन करून पोहचणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले.

Spiritual principles of Kamashilp require research: Chandrakant Channe | कामशिल्पांचे आध्यात्मिक तत्त्व संशोधनाची गरज : चंद्रकांत चन्ने

कामशिल्पांचे आध्यात्मिक तत्त्व संशोधनाची गरज : चंद्रकांत चन्ने

Next
ठळक मुद्देवि.सा.संघातर्फे ‘मंदिरावरील कामशिल्पे’वर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या देशात मिथून शिल्प किंवा कामशिल्पे असलेली १४ मंदिरे आहेत. त्यातील खजुराहो आणि कोणार्कचे सूर्यमंदिर हे प्रसिद्ध आहेत. खरंतर मंदिराच्या एकूण शिल्पात ही कामशिल्पे २ किंवा ३ टक्के आहेत. भोगवादी व आध्यात्मिक भावनांचा अद्भूत मिलाफ या मंदिराच्या कामशिल्पातून होतो. संसारातून वैराग्याकडे म्हणजेच मोक्षप्राप्तीकडे मार्गक्रमण करताना मधले दैनंदिन कामकर्तव्य महत्त्वाची असतात. मात्र त्यातील कामभावनेकडे अधिक लक्ष देण्यात आले. त्यातील आध्यात्मिक तत्त्व आपल्यापर्यंत पोहचलीच नाही. ती त्या रूपाने संशोधन करून पोहचणे गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघाच्यावतीने सर्जना निर्माण या उपक्रमांतर्गत ‘भारतीय मंदिरावरील कामशिल्पे’या विषयावर चर्चात्मक कार्यक्रम संघाच्या चौथ्या माळ्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी चन्ने यांनी कोणार्क मंदिरावर विचार मांडले. ते पुढे म्हणाले, कामशिल्पे असलेली मंदिरे मध्य भारताच्या खाली बनविल्या गेली. कोणार्कच्या सूर्यमंदिराची निर्मिती त्याकाळच्या राजाने केली. त्यातील सूर्यदेवाच्या रथाची चाके, या चक्रातील २४ रेषा, ८ आरे यांना गहन अर्थ आहे. त्याच्यामध्ये कामशिल्पे कोरली आहेत. यात शयनाची वेगवेगळी आसने आहेत. शयन किंवा मिथूनाला वेळेचे बंधन नसते, कुठल्याही मानसिकतेत ते होते, इतर सर्व भेदापेक्षा स्त्री-पुरुष हाच भेद महत्त्वाचा असतो. प्रत्येक शिल्प प्रतिकांच्या रूपात समोर येतात. वात्यायनाच्या कामासनावर आधारित ही शिल्पे अद्भूत सौंदर्याने व त्यामागील अर्थाने भरलेली आहेत. ती संवेदना समजली नाही तर भावनांचा घोळ होतो; म्हणून त्याचा अभ्यास करा, ती संवेदना जपा, असे आवाहन त्यांनी केले. 


यावेळी डॉ. रमा गोळवलकर यांनी खजुराहो येथील कंदरिया महादेव मंदिराची विशेषता सांगितली. कर्कवृत्ताच्या रेषेवर बांधलेले हे मंदिर ओलांडून सूर्यही जात नाही, यामागील खगोलशास्त्र त्यांनी उलगडून सांगितले. मंदिराचे बांधकाम वेगवेगळ्या स्तरात झाले आहे. कलश, शिखर, मंडोवर किंवा जंघा तसेच अधिष्ठान किंवा जगती असे स्तर आहेत. त्यातील जगती भागावर केवळ ३ टक्के कामशिल्पे आहेत. या कामशिल्पामध्ये संगीत, नाटक, नृत्य, शेतीची कामे व कामक्र ीडेपर्यंतच्या दैनंदिन कामांचे शिल्प कोरलेली आहेत. पंचेंद्रियांना आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये कामभावनेचाही समावेश आहे. ही कामशिल्पे मंदिराच्या बाह्य भागात जगतीवर केवळ १० ते १२ इंच मोठी आहेत. दैनंदिन कामभावना बाहेर सोडून या कामशिल्पामधील आसक्ती, तन्मयता ईश्वराबद्दल असेल तरच तुम्ही मंदिराच्या आत गाभाºयात प्रवेश करा, असा आध्यात्मिक संदेश या शिल्पांच्या माध्यमातून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. श्याम माधव धोंड यांनी मंदिरावरील कामशिल्पामधील काव्यभावना उलगडून सांगितली. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले.

Web Title: Spiritual principles of Kamashilp require research: Chandrakant Channe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.