नागपुरातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रक्रियेला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:16 PM2018-03-17T23:16:29+5:302018-03-17T23:16:41+5:30

राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे. माजी महापौर प्रवीण दटके समितीने यासंदर्भात शनिवारी बैठक घेऊन या प्रकल्पाच्या प्रक्रियेच्या प्रगतीची माहिती घेतली. येत्या १५ आॅगस्टला हा ध्वज फडकावा, या दृष्टीने कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

 The speed at the establishment of the tallest national flag in Nagpur | नागपुरातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रक्रियेला वेग

नागपुरातील सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रक्रियेला वेग

Next
ठळक मुद्देलोकमत समूह व मनपाचा प्रकल्प : १५ आॅगस्टला राष्ट्रार्पणाचा प्रयत्न


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय दृष्टिकोन विचारात घेता लोकमत समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारला जाणार आहे. माजी महापौर प्रवीण दटके समितीने यासंदर्भात शनिवारी बैठक घेऊन या प्रकल्पाच्या प्रक्रियेच्या प्रगतीची माहिती घेतली. येत्या १५ आॅगस्टला हा ध्वज फडकावा, या दृष्टीने कामाला गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
लोकमत समूहातर्फे या प्रकल्पासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या प्रकल्पाला २ कोटी ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वीच प्रकल्पाचे भूमिपूजनही आटोपले आहे. राष्ट्रध्वज उभारण्यात येणाऱ्या परिसरात परमवीर चक्र प्राप्त झालेल्या शहीद जवांनाचा इतिहास म्युरलद्वारे साकारला जाणार आहे. यामुळे या स्थळाला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होईल व शहराच्या वैभवातही भर पडणार आहे.
बैठकीत राष्ट्रध्वज उभारण्याच्या कार्यात काय अडथळे आहेत, त्याबाबत चर्चा करण्यात आली. २३ मार्च रोजी हेरिटेज समितीच्या बैठकीत सदर विषय असून ज्या काही अडचणी असतील, त्या दूर करण्यात येईल, अशी माहिती प्रवीण दटके यांनी दिली. १५ आॅगस्टपूर्वी राष्ट्रध्वज उभारणीचे काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. १५ आॅगस्टला राष्ट्रीय व राज्य पातळीवरील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीला समितीचे सदस्य विजय झलके, नगरसेवक दीपक चौधरी, एनईएसएलचे संचालक डॉ. रिजवान सिद्दिकी, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर आदी उपस्थित होते.

Web Title:  The speed at the establishment of the tallest national flag in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.