वीज बिल भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:14 AM2019-05-16T11:14:39+5:302019-05-16T11:15:30+5:30

ग्राहकांनी अधिकृत संगणकीकृत पावत्याच स्वीकाराव्यात तसेच अधिकृत पावत्या न देण्याचे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजिकच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Receive the official receipt of the electricity bill payment | वीज बिल भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात

वीज बिल भरल्याच्या अधिकृत पावत्या घ्याव्यात

Next
ठळक मुद्देमहावितरणचे ग्राहकांना आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज बिलाचा भरणा केल्यानंतर महावितरणकडून वीजग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी अशा अधिकृत पावत्या न देता वीज बिलावर केवळ शिक्का मारून देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत संगणकीकृत पावत्याच स्वीकाराव्यात तसेच अधिकृत पावत्या न देण्याचे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजिकच्या महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणने आपल्या सर्व वीज बिल भरणा केंद्रांत (पोस्ट आॅफिस सोडून) संगणकीय प्रणाली अमलात आणली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीज देयकाचा भरणा अचूक व ग्राहकाच्या खात्यावर त्वरित समायोजित होतो तसेच यामध्ये ग्राहकांना अधिकृत संगणकीकृत पावत्याही देण्यात येतात. परंतु काही ठिकाणी वीजदेयक भरल्याची अधिकृत संगणकीकृत पावती न देता केवळ वीज बील भरल्याचा शिक्का देण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. म्हणून वीज ग्राहकांनी महावितरणच्या कोणत्याही प्रकारच्या रकमेचा भरणा करताना अधिकृत पावतीचाच आग्रह धरावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: Receive the official receipt of the electricity bill payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज