राहुल गांधी यांची गुरुवारी सभा : कस्तूरचंद पार्क सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 08:17 PM2019-04-03T20:17:48+5:302019-04-03T20:26:31+5:30

अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून विदर्भातील काँग्रेसजनांना संदेश देणार आहेत. लोकसभेच्या प्रचारासाठी त्यांची विदर्भातील पहिली सभा आज, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता येथील कस्तूरचंद पार्कवर होत आहे.

Rahul Gandhi's meeting on Thursday: Kasturchand Park ready | राहुल गांधी यांची गुरुवारी सभा : कस्तूरचंद पार्क सज्ज

राहुल गांधी यांची गुरुवारी सभा : कस्तूरचंद पार्क सज्ज

Next
ठळक मुद्देकाँग्रेसजन लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून विदर्भातील काँग्रेसजनांना संदेश देणार आहेत. लोकसभेच्या प्रचारासाठी त्यांची विदर्भातील पहिली सभा आज, गुरुवारी सायंकाळी ५ वाजता येथील कस्तूरचंद पार्कवर होत आहे.
एकेकाळी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. २०१४ च्या निवडणुकीत मात्र हा बालेकिल्ला ढासळला. काँग्रेसची एकही जागा निवडून आली नाही. मात्र, गेल्या दोन वर्षात राहुल गांधी यांनी विदर्भावर बरेच लक्ष दिले. सेवाग्राम येथे अ.भा. काँग्रेस समितीची बैठक घेत एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. आता आपल्या जाहीरनाम्यात ‘न्याय’, २२ लाख सरकारी नोकऱ्या अशी आश्वासने घेऊन राहुल गांधी विदर्भात येत आहेत. त्यामुळे काँग्रेसजनांमध्ये उत्साह आहे.
गुरुवारच्या नागपूरच्या सभेनंतर शुक्रवारी, ५ एप्रिल रोजी चंद्रपूर व वर्धा येथेही राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे नागपूरच्या सभेसाठी शेजारच्या जिल्ह्यातून लोक येण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागपूर शहर व ग्रामीण मधून जास्तीत जास्त लोक सभेला आणण्यासाठी, सभेला अपेक्षित गर्दी होण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेते कामाला लागले आहेत. नागपूरच्या सभेला प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई(गवई गट), पीरिपा (कवाडे गट), शेकाप, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युवा स्वाभिमानी पक्ष, भीमसेना, युनायटेड रिपब्लिकन पक्ष, गणराज्य संघ, डेमोक्रेटिक अलायन्स, महाराष्ट्र मुस्लिम संघ, आंबेडकर विचार मंच, महाराष्ट्र परिवर्तन सेना, स्वाभिमानी रिपाई, रिपाई(खरात गट) या सर्वांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Rahul Gandhi's meeting on Thursday: Kasturchand Park ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.