हॉस्पिटलसमोर रेटबोर्ड लावावा; नागपूर ग्राहक पंचायतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:24 PM2018-01-03T12:24:16+5:302018-01-03T12:24:52+5:30

संघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या ‘कट प्रॅक्टिसवर बंदी आणणाऱ्या विधेयकाचे’ समर्थन व स्वागत करताना प्रत्येक हॉस्पिटलसमोर रेट-बोर्ड लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.

Put the rateboard before the hospital; Nagpur Consumer Panchayat Demand | हॉस्पिटलसमोर रेटबोर्ड लावावा; नागपूर ग्राहक पंचायतीची मागणी

हॉस्पिटलसमोर रेटबोर्ड लावावा; नागपूर ग्राहक पंचायतीची मागणी

Next
ठळक मुद्देराज्य सरकार विधेयक मांडणार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : संघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या ‘कट प्रॅक्टिसवर बंदी आणणाऱ्या विधेयकाचे’ समर्थन व स्वागत करताना प्रत्येक हॉस्पिटलसमोर रेट-बोर्ड लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.
समाजामध्ये डॉक्टरांना देवाचा दर्जा आहे, पण काही डॉक्टर सेवा सोडून फक्त व्यवसाय म्हणून याकडे बघत आहे. बरेचदा काही आवश्यकता नसताना फक्त कमिशन मिळणे, विदेशवाऱ्या, महागड्या भेटवस्तू मिळण्याच्या लोभापोटी अनावश्यक विविध प्रकारच्या ठराविक लॅबमधूनच महागड्या चाचण्या करणे, सिटी स्कॅन, होल बॉडी स्कॅन वगैरे चाचण्या करून रुग्ण-ग्राहकांना लुटण्याचा प्रकार निंदनीय असून तो वारंवार वाढतच आहे. याबाबत ग्राहक पंचायतने तसेच बऱ्याच प्रामाणिक डॉक्टरांनीही वारंवार आवाज उठविला आहे, याकडे पांडे यांनी लक्ष वेधले आहे.
९० टक्के हॉस्पिटलमध्ये स्वत:ची पॅथॅलॉजी लॅब आणि औषध दुकाने थाटली असून तिथे आलेल्या रुग्ण-ग्राहकांना त्याच दुकानामधूनच व ठराविक कंपन्यांचीच औषध घेणे बंधनकारक आहे.
किंबहुना लिहून दिलेली औषधे व इतर साहित्य इतरत्र औषध दुकानात मिळतच नसल्यामुळे नाईलाजाने विकत घ्यावे लागतात. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसोबतच सरकारी डॉक्टरही लुटारू झाले आहेत. अर्थातच हे सर्व कमिशन, विदेश दौरे, महागड्या भेटवस्तू व इतर प्रलोभनाकरिता केले जात असल्याच आरोप पांडे यांनी केला.

कट प्रॅक्टिस म्हणजे काय?
एखाद्या डॉक्टरने रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठविल्यानंतर संबंधित डॉक्टरकडून कमिशनच्या स्वरुपात पैसे घेणे किंवा आवश्यकता नसताना रुग्णांना ठराविक प्रयोगशाळेमधूनच तपासण्या करण्यास भाग पाडणे आणि संबंधित प्रयोगशाळेकडून मोबदला घेणे, तसेच रुग्णांना ठराविक कंपन्यांची औषधे घेण्याचा आग्रह धरणे आणि त्या बदल्यात औषध कंपन्यांकडून परदेश दौरे, महागडी भेटवस्तू घेणे.
रुग्णसेवेचा धंदा मांडणाऱ्या व संघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र शासन मार्च-२०१८ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘कट प्रॅक्टिस’वर बंदी आणणारे विधेयक आणणार आहे. कठोर कायदा करून रुग्ण-ग्राहकांची पिळवणूक व लूटमार थांबवावी, अशी मागणी गजानन पांडे, संजय धर्माधिकारी, गणेश शिरोळे, नरेंद्र कुळकर्णी, राजीव जगताप, अ‍ॅड. गौरी चांद्रायण, अ‍ॅड विलास भोसकर, अ‍ॅड प्रेमचंद्र मिश्रीकोटकर, तृप्ती आकांत व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Put the rateboard before the hospital; Nagpur Consumer Panchayat Demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.