पेट्रोलची ८० रुपयांकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:27 PM2019-05-28T23:27:56+5:302019-05-28T23:28:37+5:30

पेट्रोलच्या दरात सलग १० दिवसात ७४ पैशांची वाढ झाली असून, बुधवारी १ लिटर पेट्रोलचे दर ७७.९४ रुपयांवर पोहोचले आहेत. या दिवसात डिझेल ६१ पैशांनी वाढले आहे. अशीच दरवाढ होत राहिली तर जूनमध्ये पेट्रोल ८० रुपये लिटर खरेदी करावे लागेल.

Petrol will cost 80 rupees | पेट्रोलची ८० रुपयांकडे वाटचाल

पेट्रोलची ८० रुपयांकडे वाटचाल

Next
ठळक मुद्दे१० दिवसात ७४ पैसे वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोलच्या दरात सलग १० दिवसात ७४ पैशांची वाढ झाली असून, बुधवारी १ लिटर पेट्रोलचे दर ७७.९४ रुपयांवर पोहोचले आहेत. या दिवसात डिझेल ६१ पैशांनी वाढले आहे. अशीच दरवाढ होत राहिली तर जूनमध्ये पेट्रोल ८० रुपये लिटर खरेदी करावे लागेल.
निवडणुकीदरम्यान पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झाली नव्हती. उलट पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले होते. मात्र, शेवटचा टप्पा संपताच आणि निवडणुकांचे निकाल जाहीर होताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असल्याचे दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या दरात काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे. यामुळे कच्च्या इंधनाच्या दरावर मोठा दबाव असून दर वाढतच आहेत. अमेरिका आणि इराण या देशांमधील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर पुढे वाढून त्याचा देशांतर्गत परिणाम होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लिटर पेट्रोल दराचा वाढता क्रम
२० मे ७७.२० रु.
२१ मे ७७.२५ रु.
२३ मे ७७.३३ रु.
२५ मे ७७.६१ रु.
२६ मे ७७.७३ रु.
२७ मे ७७.८५ रु.
२९ मे ७७.९४ रु.

 

Web Title: Petrol will cost 80 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.