दीक्षाभूमीवर होणार पाली भाषा  साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 09:10 PM2018-03-09T21:10:12+5:302018-03-09T21:10:26+5:30

Pali Language Sahitya Sammelan will be organized at Dikshabhoomi | दीक्षाभूमीवर होणार पाली भाषा  साहित्य संमेलन

दीक्षाभूमीवर होणार पाली भाषा  साहित्य संमेलन

googlenewsNext
ठळक मुद्दे १७ व १८ मार्च रोजी आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : संजीवनी ह्युमन डेव्हलपमेंट सोसायटी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १८ मार्च रोजी दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर सभागृहात पाली भाषा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अमन कांबळे यांनी याबाबत शुक्रवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. १७ मार्च रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन होईल. कोलकाता येथील भदंत बोधिपाल महाथेरो हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राहतील. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे उद्घाटक राहतील तर भदंत खेमचारा, भदंत उपनंद, सोनाम वांगचूक शाक्सपो (मंगोलिया), डॉ. प्रफुल्ल गडपाल, डॉ. राजेश चंद्रा हे प्रमुख अतिथी राहतील. भदंत मेत्तानंद हे बीजभाषण करतील.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात संगोष्टी, व्याख्यान, पाली साहित्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, जातक कथा, सुत्त, काव्य पठण, नृत्य कला आणि नाटकांचे सादरीकरण होईल. सुशिला मूलजाधव, डॉ. विमलकिर्ती, डॉ. एस.एम. सोनोने, डॉ. भाऊ लोखंडे, डॉ. प्रकाश खरात, डॉ. मुन्शीलाल गौतम आदीही मार्गदर्शन करतील.
पत्रपरिषदेला भदंत डॉ. मेत्तानंद, प्रीतम बुलकुंडे, राजीव झोडापे, प्रफुल्ल भालेराव, सुशील मसराम, प्रियंका बोदिले. संदीप मेश्राम, उत्तम शेवडे, अनिरुद्ध पाटील, हर्षल रघुते उपस्थित होते.

Web Title: Pali Language Sahitya Sammelan will be organized at Dikshabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.