विघ्नहर्त्याने टाळले विघ्न !

By Admin | Published: August 30, 2014 02:40 AM2014-08-30T02:40:05+5:302014-08-30T02:40:05+5:30

जिवंत तारांसह विजेचा खांब ‘श्रीं’ च्या आगमनाच्या मिरवणुकीवर कोसळला. मोठी तारांबळ उडाली. परंतु सुदैवाने भीषण घटना टळली.

The obstacle prevented the obstacle! | विघ्नहर्त्याने टाळले विघ्न !

विघ्नहर्त्याने टाळले विघ्न !

googlenewsNext

नागपूर : महापौर पदासाठी सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांचे नाव निश्चित मानले जात असताना भाजपमधील महिला नगरसेवकांनी या पदावर महिलेला संधी देण्याची मागणी केली आहे. महिला नगरसेविकांनी वाड्यावर एकजूट दाखवीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. महिलेला महापौरपदी संधी द्यावी, अशी एकमुखी मागणी गडकरी यांच्याकडे करण्यात आली.
अडीच वर्षे महापौरपद अनिल सोले यांना सोपविण्यात आले. ५ सप्टेंबर रोजी उर्वरित अडीच वर्षांसाठी नवा महापौर निवडला जाणार आहे. आरक्षण सोडतीत महापौरपद नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) साठी आरक्षित आले आहे. दुसऱ्या टर्ममध्येही पक्षाकडून कुणी महिलेला महापौरपदी संधी द्यावी, अशी भूमिका मांडताना दिसत नसल्यामुळे भाजपच्या नगरसेविका नाराज आहेत. शुक्रवारी या नगरसेवकांनी वाड्यावर एकत्र येत आपली नाराजी बोलून दाखवित दावा सादर केला.
भाजपच्या उपनेत्या नगरसेविका नीता ठाकरे, मायाताई इवनाते, अश्विनी जिचकार, सुमित्रा जाधव, नीलिमा बावणे, पल्लवी शामकुळे, जयश्री वाडीभस्मे, रश्मी फडणवीस, मीना तिडके, चटेता टांक, दिव्या धुरडे, स्वाती आखतकर, रिता मुळे, संगीता गिऱ्हे, उषा निशितकर, सफलता आंबटकर, सुषमा चौधरी यांच्यासह ३० हून अधिक नगरसेविका सकाळी वाड्यावर पोहचल्या. माजी महापौर कल्पना पांडे यादेखील सोबत होत्या. नगरसेविकांच्या शिष्टमंडळाने गडकरी यांची भेट घेतली. महापालिकेत तीन टर्म काम करणाऱ्या महिला नगरसेविका आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेविकाही सक्षमपणे काम करीत आहेत. अर्धा कार्यकाळ संपला आहे. आता महापौर पदावर महिलेला संधी द्यावी. आरक्षणाशिवाय अधिकचा सन्मान मिळाला पाहिजे, अशी भूमिका नगरसेविकांनी मांडली. गडकरी यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेत संबंधित मागणीवर विचार केला जाईल, असे आश्वस्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: The obstacle prevented the obstacle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.