मनपा कर्मचाऱ्याला मारहाण : प्रभागातील कामावर कर्मचारी टाकणार बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:29 PM2018-09-25T23:29:42+5:302018-09-25T23:31:22+5:30

हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली परशू ठाकूर यांचे दीर विक्की ठाकूर याने त्याच्या साथीदारांसह महापालिकेचे वाहन चालक नीलेश कमल हातीबेड याला सोमवारी रात्री जबर मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी महापालिका मुख्यालयापुढे कारखाना विभाग व हनुमाननगर झोनच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. मारहाण प्रकरणातील दोषी विक्की ठाकूर याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

NMC worker assault: Employees to boycott work | मनपा कर्मचाऱ्याला मारहाण : प्रभागातील कामावर कर्मचारी टाकणार बहिष्कार

मनपा कर्मचाऱ्याला मारहाण : प्रभागातील कामावर कर्मचारी टाकणार बहिष्कार

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौर, पोलीस आयुक्तांकडे कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली परशू ठाकूर यांचे दीर विक्की ठाकूर याने त्याच्या साथीदारांसह महापालिकेचे वाहन चालक नीलेश कमल हातीबेड याला सोमवारी रात्री जबर मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी महापालिका मुख्यालयापुढे कारखाना विभाग व हनुमाननगर झोनच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. मारहाण प्रकरणातील दोषी विक्की ठाकूर याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.
कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार, पोलीस आयुक्त भूषण कुमार उपाध्याय यांच्यासह महापालिक अधिकारी व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. जोपर्यत आरोपीला पकडून कारवाई होत नाही तोपर्यंत प्रभाग क्रमांक ३२ मध्ये महापालिकेच्या कोणत्याही विभागाचे कर्मचारी सेवा देणार नाही. तसेच हनुमाननगर झोनमधील सफाई कर्मचाऱ्यांनी कामावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. विक्की ठाकूर याच्यावर कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
सफाई कर्मचारी नीलेश हातीबेड कारखाना विभागात चालक आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास विसर्जनाची माती काढताना शारदा चौक येथे विक्की ठाकूर व त्याच्या साथीदारांनी नीलेशला जबर मारहाण केली. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, नीलेशला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कारखाना विभागातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. कारखाना विभागातील १२३ कर्मचारी यात सहभागी झाले. काही आवश्यक सेवेतील कर्मचारी मात्र कामावर होते.
मंगळवारी दुपारी महापालिका मुख्यालयात कर्मचारी एकत्र झाले. त्यांना मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळाला. अर्धा दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी महापौर नंदा जिचकार यांना निवेदन देऊ न दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली. महापौरांनी पोलीस आयुक्तांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली तसेच दोषीवर कठोर कारवाई करण्यास सांगितले. झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांना या प्रकरणात पोलिसात तक्रार करण्यास सांगितले.
महापालिका मुख्यालयातील आंदोलनात किशोर समुंद्रे, अविनाश डेलीकर, सुनील जाधव, विक्की बढेल, दीपक कस्तुरे, चेतन समुंद्रे, नवीन समुंद्रे, राजेश हातीबेड, गोविंददास खरे, नितीन वामन, संजू खरे, विशाल मोगरे, राजा समुंद्रे, नितीन बिरहा आदींचा समावेश होता.

Web Title: NMC worker assault: Employees to boycott work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.