नागपुरातील मैदानांच्या वाईट स्थितीबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू मंगळवारी लावणार ‘दौड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 08:36 PM2017-12-23T20:36:15+5:302017-12-23T20:38:59+5:30

रेशीमबाग मैदानावर गिट्टी, माती व पडून असलेले साहित्य पडून असल्याने खेळाडुंना या मैदावर सराव करता येत नाही. प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मंगळवारी नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान ‘दौड’ लावणार आहेत.

National and international players to 'fight' on Tuesday for bad situation in Nagpur Plains | नागपुरातील मैदानांच्या वाईट स्थितीबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू मंगळवारी लावणार ‘दौड’

नागपुरातील मैदानांच्या वाईट स्थितीबद्दल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू मंगळवारी लावणार ‘दौड’

googlenewsNext
ठळक मुद्दे रेशीमबाग मैदानाचे अस्तित्व संकटातप्रशासनाला जागे करणार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : रेशीमबाग मैदानावर गेल्या काही वर्षापासून प्रदर्शनी, मेळावे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे मैदानावर गिट्टी, माती व पडून असलेले साहित्य पडून असल्याने खेळाडुंना या मैदावर सराव करता येत नाही. यामुळे खेळाडुमध्ये तीव्र असंतोष आहे. प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध म्हणून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मंगळवारी नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान ‘दौड’ लावणार आहेत. त्यानंतरही मैदान खेळासाठी उपलब्ध न झाल्यास रेशीमबाग मैदानावर होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाच्यावेळी धरणे आंदोलन करणार आहे.
पोलिस भरती, सैन्य भरतीची तयारी करण्यासाठी विद्यार्थी व खेळाडू रेशमबाग मैदानावर दररोज सराव करण्यासाठी येतात. परंतु या मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू असते. त्यामुळे त्यांना सराव करता येत नाही. शुक्रवारी खेळाडू व विद्यार्थी मैदानावर सराव करण्यासाठी आले होते. परंतु येथे काही लोक डांबर मिश्रीत माती पसरवत होते. सी.पी.अ‍ॅन्ड बेरार कॉलेजच्या मैदानाकडील बाजुने शंभर ट्रक डांबर मिश्रीत माती टाकलेली होती. यामुळे मैदानावर धावता येत नव्हते. याची माहिती खेळाडुंनी मंगेश खूरसुडे यांना दिली. यावेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेतेले खेळाडू येथे उपस्थित होेते. खूरसुडे यांनी यासंदर्भात युवक काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांना माहिती दिली. त्यांनी मैदानावर आल्यानंतर नासुप्रच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. थोड्या वेळात अधिकारी मैदानावर पोहचले. त्यांनी मैदान व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले. खेळाडुंचा विरोध विचारात घेता शुक्रवारी रात्री उशिरापर्यत मैदानावरील निरुपयोगी साहित्य हटविण्याचे काम सुरू होते. पहाटे पर्यत मैदान व्यवस्थित करण्यात आले.
या मैदानावर कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये. अशी खेळाडुंची मागणी आहे. सी.पी.अ‍ॅन्ड बेरार, न्यू इंग्लिश व डी.डी.नगर विद्यालयाला २० एकराचे मैदान लीजवर देण्यात आले आहे. मैदान कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचे बंद करण्यात यावे. अशी खेळाडुंची मागणी आहे. मैदानावर सराव करता येत नसल्याने पोलिस व सैन्य भरतीची तयारी करणाऱ्यांना याचा फटका बसत आहे.

 

Web Title: National and international players to 'fight' on Tuesday for bad situation in Nagpur Plains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा