नल्ला मुत्थू यांनी अनेक वर्षे जंगलात राहून टिपल्या वाघांच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:35 AM2019-01-12T00:35:31+5:302019-01-12T00:37:13+5:30

भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला प्रत्यक्ष समोर पाहिल्यावर कुणाचाही थरकाप उडेल. मात्र एक खर की त्याचे रुबाबदार रूप प्रत्येकालाच आकर्षित करणारे. बहुतेक वनक्षेत्राचे पर्यटनही अवलंबून आहे ते वाघांच्या आकर्षणावरच. परदेशी पर्यटकांनाही ते भारताकडे खचून आणते. हे एवढे आकर्षण का आहे, याची प्रचिती केरळच्या फोटो-व्हिडीओग्राफर व दिग्दर्शक नल्ला मुत्थू यांच्या माहितीपटाने आली. मुत्थू यांनी अनेक वर्ष विविध वनक्षेत्रात वाघांच्या हालचाली टिपून माहितीपट तयार केलेले आहेत. यातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मछली आणि तिची मुलगी क्रिष्णा यांचे माहितीपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले.

Nalla Muthu spent many years in the forest and cought tigers movement by camera | नल्ला मुत्थू यांनी अनेक वर्षे जंगलात राहून टिपल्या वाघांच्या हालचाली

नल्ला मुत्थू यांनी अनेक वर्षे जंगलात राहून टिपल्या वाघांच्या हालचाली

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला उद्योजिका मेळाव्यात दाखविले त्यांनी निर्मित केलेले माहितीपट : मछली व क्रिष्णा वाघिणींनी खिळविले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाला प्रत्यक्ष समोर पाहिल्यावर कुणाचाही थरकाप उडेल. मात्र एक खर की त्याचे रुबाबदार रूप प्रत्येकालाच आकर्षित करणारे. बहुतेक वनक्षेत्राचे पर्यटनही अवलंबून आहे ते वाघांच्या आकर्षणावरच. परदेशी पर्यटकांनाही ते भारताकडे खचून आणते. हे एवढे आकर्षण का आहे, याची प्रचिती केरळच्या फोटो-व्हिडीओग्राफर व दिग्दर्शक नल्ला मुत्थू यांच्या माहितीपटाने आली. मुत्थू यांनी अनेक वर्ष विविध वनक्षेत्रात वाघांच्या हालचाली टिपून माहितीपट तयार केलेले आहेत. यातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मछली आणि तिची मुलगी क्रिष्णा यांचे माहितीपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले.
नल्ला मुत्थू यांनी राजस्थानच्या रणथंबोर अभयारण्यात ९ वर्षे जगातील सर्वाधिक लोकप्रिय मछली या वाघिनीवर आणि पुढे अडीच वर्षे क्रिष्णा या वाघिणीवर हे माहितीपट तयार केले. खरतर त्यास माहितीपट म्हणण्यापेक्षा मानवीतेशी जोडून तयार केलेला भावनिक ड्रामा म्हणू शकतो. २००७ साली मछली अगदी तरुण असतानापासून ऑगस्ट २०१६ मध्ये तिच्या निधनापर्यंतची ही स्टोरी भावनिक करते. तारूण्यात स्फु र्तीने शिकार करणारी, आपल्या सुंदरी, बघानी व क्रिष्णा या तीन मुलींच्या संरक्षणासाठी प्रत्येक आव्हानांचा सामाना करणारी, पुढे याच मुलींसमोर हतबल झालेल्या मछलीचा १८-१९ व्या वर्षी नैसर्गिक असला तरी वृद्धावस्थेमुळे वेदनादायक वाटणारा अंत पाहणाऱ्यांना भारावणारा ठरतो. मछलीच्या या माहितीपटाने मुत्थू यांना अनेक पुरस्कारांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविले. याच मछलीची मुलगी क्रिष्णाचा माहितीपट असाच मानवीयतेने गुंफलेला. तिच्या बिजली व अ‍ॅरोहेड या दोन मुली व भोला हा मुलगा. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रसंगी मगरीशी लढणाऱ्या क्रिष्णाचे दृश्य पाहताना प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा होतो. मछली या वाघिणीची मुले, नातवंड आणि त्यापुढच्या वंशावळीचा प्रवास त्यांच्या माहितीपटात येतो. खरतर या वाघिणींच्या अनेक वर्षांच्या हालचाली टिपून तयार झालेले हे माहितीपट. मात्र मानवी भावनेशी जोडून केलेले हे सादरीकरण आणि त्यातील रोमांच प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
नागपूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या सहाव्या दिवशी एशियाटीक बिग कॅट सोसायटी तसेच वनराई फाउंडेशन व रोटरी क्लब आॅफ नागपूर इलाईट यांच्या संयुक्त विद्यमाने मत्थू यांचे मछली व क्लॅश ऑफ टायगर्स हे दोन माहितीपट प्रदर्शित करण्यात आले.
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, सामाजिक कार्यकर्त्या व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोहिणी पाटील, एमडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक रामबाबू, डॉ. मनमोहन राठी, पीजीडी रोटरी डिस्ट्रीक्ट ३०३० चे किशोर केडिया, मनपाच्या विभागाच्या सभापती प्रगती पाटील, उपसभापती विशाखा मोहोड, नगरसेविका जयश्री वाडीभस्मे आदींच्या उपस्थितीत मशाल पेटवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. प्राची मते, डॉ. झरीना राणा, डॉ. विशाखा घोषाल, डॉ. केका रॉय, डॉ. सपना काळे यांच्यासह डॉ. रेणूका जांभोरकर, डॉ. जयश्री रेहपाडे, गार्गी वैरागडे, शितल चिद्दरवार व डॉ. नीला सप्रे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एशियाटीक बिग कॅट सोसायटीचे सचिव व वनराईचे विश्वस्त अजय पाटील यांनी केले. सुरुवातीच्या कार्यक्रमाचे संचालन रेखा दंडिगे-घिया यांनी केले.
सामान्य माणसांनी भावनेने जुळावे : मुत्थू
माहितीपट तयार करणाऱ्या दिग्दर्शक नल्ला मत्थू यांना यावेळी गौरविण्यात आले. आपल्या मनोगतात ते म्हणाले, आज देशातील वाघांची संख्या कमी कमी होत आहे. याचे कारण लोक जंगलांशी दर्शकांप्रमाणे टीव्हीपुरतील जुळली आहेत. त्यांनी मानवीयतेने जुळावे लागेल, नाहीतर आपल्यासाठी ते टीव्हीपुरते मर्यादित राहतील, अशी भावना त्यांनी मांडली. सध्या ते विदर्भातील माया या वाघिणीवर माहितीपट तयार करीत आहेत. मी वाघांशी भावनिकतेने जुळला आहे. मछली व क्रिष्णासह इतर वाघांच्या सानिध्यातील अनुभवही त्यांनी मांडले. लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करणे हा उद्देश असल्याचे मनोगत त्यांनी मांडले.

Web Title: Nalla Muthu spent many years in the forest and cought tigers movement by camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.