नागपूरची श्रद्धा ठरली ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 07:53 PM2019-07-22T19:53:49+5:302019-07-22T19:57:48+5:30

नागपूरच्या श्रद्धा जवळकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत विजेतेपदाचा किताब पटकावला असून, त्या ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ ठरल्या आहेत.

Nagpur's Shradha declared as 'Mrs Central India' | नागपूरची श्रद्धा ठरली ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ 

नागपूरची श्रद्धा ठरली ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ 

Next
ठळक मुद्देहळूहळू रोवतेय अभिनय क्षेत्रात पावले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या श्रद्धा जवळकर यांनी नुकत्याच पार पडलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत विजेतेपदाचा किताब पटकावला असून, त्या ‘मिसेस सेंट्रल इंडिया’ ठरल्या आहेत.
विशेष म्हणजे, श्रद्धा वर्तमानात मँगलोर येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे माहेर नागपूरचे (मुलमुले) आणि सासर औरंगाबादचे असून, पती प्रवीण जवळकर यांच्या नोकरी व्यवसायानिमित्ताने त्या मँगलोर येथे वास्तव्याला आहेत. श्रद्धा यांना महाविद्यालयीन काळापासूनच अभिनय क्षेत्रात रस होता. मात्र, अभ्यास, करिअर आणि विवाहानंतरच्या व्यस्ततेमुळे त्या काळात त्यांनी या क्षेत्राकडे दुर्लक्ष केले. मात्र, प्रवीण यांच्या प्रोत्साहनानंतर त्यांनी सौंदर्यस्पर्धेत नशीब आजमावण्याचे प्रयत्न सुरू केले. विशेष म्हणजे, त्यांना दहा वर्षाची मुलगी आहे. त्यांनी यापूर्वी मिसेस मँगलोर स्पर्धेत सहभाग घेऊन पहिल्याच प्रयत्नात उपविजेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर, त्यांना कोकणी वाहिनीवरील एका मालिकेत संधी मिळाली आणि अभिनयाची हौस भागवता आली. दरम्यान, त्यांनी नागपूरमध्ये होणाऱ्या सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेऊन या स्पर्धेत त्यांनी विजेतेपदाला गवसणी घालत ‘मिसेस सेंट्रल इंडिया’चा किताब पटकावला आहे. श्रद्धा यांना आता नागपूरमध्ये काही काळ घालवून नाटकांच्या विश्वात रमायचे असल्याची भावना, त्यांनी या विजयानंतर व्यक्त केली.

Web Title: Nagpur's Shradha declared as 'Mrs Central India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर