संकटकाळात श्रेणी बदलू शकते नागपूर विमानतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:23 AM2018-09-22T11:23:45+5:302018-09-22T11:24:41+5:30

संचालित होणाऱ्या विमानांचे प्रकार आणि उड्डाणाची संख्या पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ संकटकाळात आपल्या श्रेणीत बदल करू शकते.

The Nagpur Airport can change the range during the crisis | संकटकाळात श्रेणी बदलू शकते नागपूर विमानतळ

संकटकाळात श्रेणी बदलू शकते नागपूर विमानतळ

googlenewsNext
ठळक मुद्देआठ हजार उंचीपर्यंत दाब सहनीय

वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संचालित होणाऱ्या विमानांचे प्रकार आणि उड्डाणाची संख्या पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ संकटकाळात आपल्या श्रेणीत बदल करू शकते.
नागपूर विमानतळ फायर व क्रॅश स्टॅण्डर्डमुळे सातव्या श्रेणीत मोडते. पण जेट बोर्इंग-७७७ आणि एअरबस-३२० या सारख्या मोठ्या विमानाच्या आकस्मिक लॅण्डिंगची सूचना मिळताच सूचनेपासून लॅण्डिंगपर्यंत विमानतळाचा सातव्या श्रेणीतून आठव्या श्रेणीत बदल होतो. सातव्या वर्गवारीत नागपूर विमानतळावर तीन अ‍ॅम्ब्युलन्स, डॉक्टर, सुरक्षा कर्मचारी, फायर स्टेशन कर्मचारी, फायर क्रॅश टेंडरसह अन्य सुविधांचा समावेश आहे. याच्या तयारीची समीक्षा करण्यासाठी मॉक ड्रीलच्या माध्यमातून वेळोवेळी तपासणी करण्यात येते. जेटचे मुंबई-जयपूर विमान-९डब्ल्यू ७९७ च्या घटनेसंदर्भात अधिकाऱ्याना विचारणा केली असता त्यांनी नागपूर विमानतळावर सर्व सोईसुविधा असल्याचे सांगितले.

विमानतळावर सर्व सोईसुविधा
उड्डाणाची संख्या आणि विमानांच्या प्रकारानुसार विमानतळावर संकटकाळात मात करण्यासाठी पुरेपूर व्यवस्था आहे. पूर्वसूचना मिळताच विमानतळ सातव्या वर्गवारीतून आठव्या वर्गवारीत परावर्तित करता येते. याकरिता खासगी रुग्णालयाशी करार केला आहे. शिवाय मेयो रुग्णालयातून आवश्यक संख्येत डॉक्टरांना बोलविता येऊ शकते.
-विजय मुळेकर, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.

आठ हजार उंचीपर्यंत दाब सहनीय
फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एफएए) नुसार आठ हजार फूट उंचीवर विमानात प्रवाशांना आणि केबिनमध्ये हवेचा दाब सहन करता येतो. विमानाची उंची त्यापेक्षा जास्त असली तर प्रवासी आणि चालक दलासाठी केबिनमध्ये विशेष यंत्रणेद्वारे सुरक्षित आणि आरामदायक वातावरण तयार करता येते. जास्त उंचीवर आॅक्सिजनचा स्तर कमी झाल्यास त्याचा फुफ्फुस आणि मेंदूवर परिणाम होतो. विमान जास्त उंचीवर गेल्यास हवेचा दाब कायम ठेवणारी यंत्रणा स्वयंचलित काम करते. पण जेट एअरलाईन्सच्या मुंबई-जयपूर विमानातील घटना १४ हजार फूट उंचीवर घडली. त्यावेळी काय झाले हा संशोधनाचा विषय आहे.

Web Title: The Nagpur Airport can change the range during the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.