दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर नागपुरात अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 10:32 AM2018-03-15T10:32:21+5:302018-03-15T10:32:30+5:30

दहावीची परीक्षा देऊन घरी परत येत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार खरबी येथे घडला. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहे.

minor girl molested while returning from the SSC examination in Nagpur | दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर नागपुरात अत्याचार

दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर नागपुरात अत्याचार

ठळक मुद्देजागतिक महिला दिनी झाला अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावीची परीक्षा देऊन घरी परत येत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बळजबरी अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार खरबी येथे घडला. नंदनवन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ८ मार्च रोजी घडली. पीडित विद्यार्थिनी दहावीला शिकते. सध्या तिची दहावीची परीक्षा सुरू आहे. त्या दिवशी तिचा दहावीचा पेपर होता.
पेपर देऊन ती घरी परत जात होती. आरोपी तिला रस्त्यात भेटला. घरापर्यंत सोडून देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या गाडीवर बसवले आणि स्वत:च्या घरी नेले. त्या दिवशी आरोपीच्या घरी कुणीही नव्हते. त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीशी बळजबरी अत्याचार केला. तिने आरडाओरड केली असता मारहाण केली. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीला घाबरलेली विद्यार्थिनी काही दिवस शांत होती. परंतु नंतर तिने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला.
तिच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार केली. नंदनवन पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२), ३२३, ५०६ भादंवि सहकलम ४ पोक्सो अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पोलीस सूत्रानुसार आरोपी व पीडित मुलीची ओळख एका लग्नसमारंभात झाली होती. दोघांमध्ये बोलणे होत होते. दरम्यान आरोपीने पीडित मुलीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. परंतु तिने तो नाकारला. यामुळे नाराज होऊन आरोपीने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: minor girl molested while returning from the SSC examination in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा