Mahavitran has to recover 97 lacs | महावितरणला करायचीय ९७ लाखाची वसुली
महावितरणला करायचीय ९७ लाखाची वसुली

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : अ‍ॅफकॉन्स कंपनीकडे थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अ‍ॅफकॉन्स कंपनीकडून ९७ लाख २८ हजार २२९ रुपये वसूल करण्यासाठी महावितरण कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
महावितरणने अ‍ॅफकॉन्सला कळमना परिसरात रेडिमिक्स काँक्रिट प्रकल्प चालविण्यासाठी व्यावसायिक दराने वीज पुरवठा केला होता. दरम्यान, १२ मे २००९ रोजी करण्यात आलेल्या आकस्मिक तपासणीत अ‍ॅफकॉन्सने वीज वापरात गैरप्रकार केल्याचे आढळून आले. त्यामुळे अ‍ॅफकॉन्सवर ९७ लाख २८ हजार २२९ रुपयांची वसुली काढण्यात आली. अ‍ॅफकॉन्सने या वसुलीविरुद्ध प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले असता वसुलीचा आदेश अवैध ठरविण्यात आला. त्या निर्णयाला महावितरणने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता अ‍ॅफकॉन्स कंपनी व प्रथम अपिलीय अधिकाऱ्याला नोटीस बजावून यावर १ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. महावितरणतर्फे अ‍ॅड. श्रीधर पुरोहित तर, अ‍ॅफकॉन्सतर्फे अ‍ॅड. राहील मिर्झा यांनी कामकाज पाहिले.


Web Title: Mahavitran has to recover 97 lacs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.