Lokmat Women Summit 2022 : सिंड्रेलाची स्टोरी नको.. समाजाने लादलेल्या बंधनातून मोकळं व्हायची गरज - मनीषा म्हैसकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 06:49 PM2022-05-14T18:49:01+5:302022-05-14T19:08:51+5:30

Lokmat Women Summit 2022 : आपला कम्फर्ट सोडला तर जगण्याची नवी दिशा आणि भरारीसाठी नवीन आकाश गवसेल, लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावर महिलांच्या क्षमतांचा जागर

Lokmat Women Summit 2022 : Explain how children can break the various bonds imposed by society says manisha mhaiskar | Lokmat Women Summit 2022 : सिंड्रेलाची स्टोरी नको.. समाजाने लादलेल्या बंधनातून मोकळं व्हायची गरज - मनीषा म्हैसकर

Lokmat Women Summit 2022 : सिंड्रेलाची स्टोरी नको.. समाजाने लादलेल्या बंधनातून मोकळं व्हायची गरज - मनीषा म्हैसकर

Next

नागपूर : मुलींना सिंड्रेला, तिची ग्लास सँडल व त्यावरून तिचा शोध घेणाऱ्या राजकुमारची स्टोरी सांगण्याऐवजी ग्लास सिलिंग म्हणजेच समाजाने अनेक काळापासून महिलांवर लादलेली बंधने कशी तोडायची याबाबत सांगणे गरजेचे आहे. असे असे मत पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर व्यक्त केले. त्या आज लोकमततर्फे आयोजित वूमेन समीट कार्यक्रमात बोलत होत्या. 

म्हैसकर यांनी प्रशासकीय सेवेत विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महिला अधिकारी म्हणून आलेले चांगले वाईट अनुभव मांडले. आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यात कुठलीच तडजोड करू नका, उत्तूंग स्वप्न पाहा कारण त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासारखा दुसरा आनंद जगात नाही. त्यामुळे आजचा क्षण संपूर्णपणे जगायला शिका, असे आवाहन त्यांनी केले.

स्त्रीचे अस्तित्व, अभिव्यक्ती, ‘ती’च्या नजरेतून जाणून घेण्यासाठी लोढा गोल्ड टीएमटी बार प्रस्तुत लोकमततर्फे पिजन आणि निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., नागपूर यांच्या सहकार्याने लोकमत वुमेन समिटचे नववे पर्व शनिवारी (दि. १४) नागपुरात हाटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित करण्यात आले होते. सामाजिक, शिक्षा, आरोग्य, साहस, क्रीडा, व्यवसाय आदि क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या या महिलांना त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणासाठी कार्य करणाऱ्या अहमदनगरच्या रत्नाताई कांबळे यांना ज्योत्सना कार्य गौरव पुरस्कार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या नलिनी नावरेकर यांना ‘मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, विजय दर्डा  अध्यक्षस्थानी होते. उर्जामंत्री राऊत यांनी महिलांच्या कार्याचा गौरव करताना महिला सशक्तीकरण धोरण अधिक सक्षमपणे राबविण्याबाबतचे मत व्यक्त केले. आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक परीक्षेत मुली टॉप करताना दिसताहेत. त्यांचे कर्तुत्व पुरुषांपेक्षा सरस ठरत आहे. घराबाहेरच नव्हे तर घरातही आपलं सर्वस्व पणाला लावणारी आई, बहीण, पत्नी या सर्वांच्या कार्याचा गौरव व्हायलाच हवा, असे भाव डॉ. राऊत यांनी व्यक्त केले.

एकमेकींचा आधार बनत एकमेकींना पुढे न्यायला हवे

ग्रॅव्हिटास फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे म्हणाल्या, स्त्रीमध्ये जग घडविण्याचे सामर्थ्य असून एकमेकींचा आधार बनत एकमेकींना पुढे न्यायला हवे. समाजात महिलांना आजही समान हक्क मिळतोय का? घरातील निर्णय प्रक्रियेत त्यांना समान स्थान आहे का, त्या खरच स्वतंत्र आहेत का, यावरही विचार करण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Lokmat Women Summit 2022 : Explain how children can break the various bonds imposed by society says manisha mhaiskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.