कोराडी होणार महाराष्ट्राचे पॉवर हाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:27 PM2019-06-18T23:27:00+5:302019-06-18T23:28:21+5:30

कोराडीने महाराष्ट्र राज्याचे पॉवर हाऊस बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. येथे २४१८ मेगावॅट वीज क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र कार्यरत आहे. आता राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात १३२० मेगावॅट क्षमतेचे नवीन औष्णिक वीज केंद्राला मंजुरी दिली आहे. हे साकार होताच कोराडी येथे एकूण ३७३८ मेगावॅट क्षमतेचे केंद्र स्थापित होईल. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कोराडी हे राज्याचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाईल.

Koradi will be the power house of Maharashtra | कोराडी होणार महाराष्ट्राचे पॉवर हाऊस

कोराडी होणार महाराष्ट्राचे पॉवर हाऊस

googlenewsNext
ठळक मुद्दे१३२० मेगावॅटचे प्रकल्प साकारणार : ८४०७ कोटी रुपये येणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडीने महाराष्ट्र राज्याचे पॉवर हाऊस बनण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. येथे २४१८ मेगावॅट वीज क्षमतेचे औष्णिक वीज केंद्र कार्यरत आहे. आता राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात १३२० मेगावॅट क्षमतेचे नवीन औष्णिक वीज केंद्राला मंजुरी दिली आहे. हे साकार होताच कोराडी येथे एकूण ३७३८ मेगावॅट क्षमतेचे केंद्र स्थापित होईल. त्यामुळे येणाऱ्या दिवसात कोराडी हे राज्याचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाईल.
सध्या कोराडी औष्णिक वीज केंद्रात पाच युनिट कार्यरत आहेत. येथे २१० व २२८ मेगावॅटच्या युनिटसह ६६०-६६० मेगावॅट क्षमतेचे आणखी तीन युनिट आहेत. राज्य सरकारने मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात येथे आणखी १३२० मेगावॅटच्या नवीन युनिटला मंजुरी प्रदान केली आहे. यावर एकूण ८४०७ कोटी रुपये खर्च येणार असल्याचेही बजेटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
महाजेनकोच्या सूत्रानुसार नवीन प्रकल्पात ६६० मेगावॅटचे दोन युनिट स्थापित होतील. त्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानाने तयार केल्या जातील. यामुळे प्रदूषण होणार नाही. महाजेनकोनुसार नवीन प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित करावी लागणार नाही. केंद्राच्या बंद असलेल्या १ ते ५ क्रमाकांच्या युनिटच्या जागेवरच ती साकार केली जाईल. केंद्राची १ ते ४ क्रमाकांची युनिटची क्षमता १२० मेगावॅट व ५ क्रमाकांच्या युनिटची क्षमता २०० मेगावॅट इतकी होती. एनजीटीच्या मानकाप्रमाणे अधिक प्रदूषण करीत असल्यामुळे २५ वर्षापेक्षा जास्त उत्पादन केलेल्या युनिटला बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्य सरकारने २०१४ मध्ये या युनिटला बंद केले होते.
आता याच युनिटच्या जवळपास दोन हजार एकर जागेवर नवीन वीज केंद्र स्थापित करण्यात येईल. यासाठी जास्तीच्या अधिग्रहणाची आवश्यकता राहणार नाही.
या नवीन प्रकल्पाला मंजुरी दिल्याद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार. नवीन प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार होईल. यात प्रदूषणाची शक्यताही राहणार नाही.
चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री

नागपुरात ५०७८ मेगावॅट वीज
कोराडी येथील नवीन औष्णिक वीज केंद्र साकार झाल्यानंतर वीज उत्पादन कंपनी महाजेनकोच्या नागपूर जिल्ह्यातील उत्पादनक्षमता एकूण ५०७८ मेगावॅट इतकी होईल. कोराडी येथील एकूण उत्पादन ३७३८ मेगावॅट इतके होईल. तर लागूनच असलेल्या खापरखेडा वीज केंद्राची उत्पादनक्षमता १३४० मेगावॅट इतकी आहे. या दोघांची एकूण उत्पादन क्षमता जोडल्यास ती ५०७८ मेगावॅट इतकी होईल. यासोबतच केंद्र सरकारची कंपनी एनटीपीसी ही सुद्धा मौद्यात असून तिची एकूण क्षमता २३२० मेगावॅट इतकी आहे. याशिवाय एक खासगी कंपनी सुद्धा जिल्ह्यात विजेचे उत्पादन करीत आहे.
मौदा, उमरेड, काटोल व सावनेर येथे गोवंश सेवा केंद्र
मंगळवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात गोवर्धन गोवंश सेवा केंद्राला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ३४.७५ कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील मौदा, उमरेड, काटोल, सावनेर या चार उपविभागात गोवर्धन गोवंश केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शासनाच्या निकषात बसणाºया संस्थांना या योजनेंर्गत गोशाळा सुरु करण्याकरिता प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४ लाख २८ हजार ३५० एवढ्या मोठ्या प्रमाणात पशुधन आहे.

Web Title: Koradi will be the power house of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.