‘व्हीआयए-आरएससी’तर्फे नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 10:49 AM2018-09-07T10:49:50+5:302018-09-07T10:51:44+5:30

रमण सायन्स सेंटर (आरएससी)आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) यांनी रमण सायन्स केंद्रात स्थापन केलेली अनोखी व नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा उद्योजकांना आणि नव्याने उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी फायद्याची आहे.

Innovative laboratory by VIA-RSC | ‘व्हीआयए-आरएससी’तर्फे नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा

‘व्हीआयए-आरएससी’तर्फे नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा

Next
ठळक मुद्देउद्योजकांसाठी फायद्याचीसंकल्पनेला मूर्त स्वरूप मिळणार

उदय अंधारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रमण सायन्स सेंटर (आरएससी)आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए) यांनी रमण सायन्स केंद्रात स्थापन केलेली अनोखी व नावीन्यपूर्ण प्रयोगशाळा उद्योजकांना आणि नव्याने उद्योग सुरू करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी फायद्याची आहे. उद्योजकांच्या संकल्पनेला येथे मूर्त स्वरूप मिळत आहे.
या प्रयोगशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांसह नवीन उद्योजकांना त्यांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी होत आहे. छोट्या स्तरावर काम करणाऱ्यांना या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मोठ्या स्तरावर काम करणे शक्य होणार आहे. या प्रयोगशाळेची स्थापना गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात आली. नावीन्यपूर्ण संशोधनासाठी आरएससीने इकोसिस्टिम तयार केली आहे. तर प्रयोगशाळा कार्यान्वित होण्यासाठी व्हीआयएने भांडवली स्वरूपात मदत केली आहे. कोणताही उद्योजक तसेच यूजी, पीजी, डॉक्टरेट आणि पोस्ट डॉक्टरेट डिग्रीचा विद्यार्थी एक हजार रुपये वार्षिक शुल्क देऊन या नावीन्यूपर्ण प्रयोगशाळेचा सदस्य होऊ शकतो.
आरएससीमधील या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या संकल्पनेवर काम करण्यासाठी मार्गदर्शक, वाचनालय, वर्कशॉप अणि उपकरणे आहेत. कोणतीही संकल्पना जर ती वैज्ञानिकरीत्या तंतोतंत आणि सामाजिकरीत्या उपयोगी असेल तर प्रयोगशाळेच्या मार्गदर्शकांतर्फे मूल्यमापन करून यशस्वी होण्यासाठी शास्त्रीयरीत्या मार्गदर्शन करण्यात येते.
आरएससीतर्फे संकल्पनेला पेटेंट करण्यासाठी मदत करण्यात येत असल्याचे रमण सायन्स केंद्राचे समन्वयक एन रामदास अय्यर यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना सांगितले. केमेस्ट्रीमध्ये डॉक्टरेट असलेल्या डॉ. प्रीती तायडे आणि व्यवसायाने अभियंते असलेले डॉ. जावड ए के लोधी हे दोघे नावीन्यपूर्ण प्रयोगशाळेचे मार्गदर्शक आहेत.
डॉ. प्रीती तायडे यांनी सांगितले की, हा प्रकल्प ‘न्यूटन अविष्कार विचार इन नागपूर’ (एनएव्हीआयएन) या नावाने असून याअंतर्गत उद्योजक, विद्यार्थी आणि नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी भरपूर संधी आहेत. एनएव्हीआयएन प्रोग्रामांतर्गत आरएससीने ३१ आॅगस्टपर्यंत निवड केलेल्या ३०० विद्यार्थ्यांना व्हीआयए मदत करणार आहे. एन. रामदास अय्यर यांच्या मते ज्या क्षेत्रात संशोधन केले जाऊ शकते त्यामध्ये प्लास्टिक डिग्रेडिंग, रोबोटिक्स, ग्रीन टेक्नॉलॉजी, आॅटोमोबाईल इंजिनिअरिंग, वॉटर प्युरिफिकेशन, रेफ्रिजरेशन, सोलर टेक्नॉलॉजी, पॉवर सेव्हिंग आणि इतर अनेकांचा समावेश आहे. आरएससी केवळ विद्यार्थ्यांसाठीच असल्याचे मत खोडून काढणे आवश्यक आहे. म्हणूनच, उद्योजकांची संख्या वाढावी यासाठी त्यांनी नाममात्र सदस्यता शुल्कात या सुविधांचा उद्योजकांनी लाभ घ्यावा आणि संकल्पना प्रत्यक्षात आणाव्यात, असे अय्यर म्हणाले.

एलपीजीची गळती रोखण्यासाठी एसएमएस अलर्ट
अभिनव प्रयोगशाळेची सिद्धता एक डझनभर आहे. बी.एस्सी.चे तीन पूर्वस्नातक विद्यार्थी वासुदेव मिश्रा, सूरज नालगे आणि कुणाल राठी यांना प्लास्टिकच्या डिग्रेडेशनसाठी उपयुक्त तीन मातीची बुरशी वेगळे करणे शक्य झाले आहे. अ‍ॅस्परगिलस ट्युबिनजेनेसिस, रोडोकोकस ट्युबर आणि सुडोमिनस अशा या तीन बुरशींची नावे आहेत. त्याचप्रमाणे बारावीचे विद्यार्थी अमान श्रीवास्तव एलपीजीची गळती रोखण्यासाठी ई-नोज एसएमएस अलर्ट विकसित करू शकला. त्याचप्रमाणे सीडीएसच्या श्रीनबाय अग्रवालने ओटीपीचे हॅकिंग टाळण्याकरिता एक वेळचा पासवर्ड जनरेटर विकसित केला आहे.
प्रयोगशाळेत भाज्यांच्या अवशेषापासून प्लास्टिक
प्रयोगशाळेचे मुख्य मार्गदर्शक डॉ. प्रीती तायडे यांनी प्रयोगशाळेत भाज्यांच्या अवशेषांपासून प्लास्टिक तयार केले आहे. त्यांना भाज्यांच्या अवशेषांपासून स्टार्च आणि सेल्युलोज वेगळे करून त्याला प्लास्टिकमध्ये रूपांतरित करणे शक्य आहे. या प्रकारच्या प्लास्टिकपासून मोठ्या प्रमाणात विविध उत्पादने जसे टॅबलेट कॅप्सूल, स्ट्रा, प्लेट, कपची निर्मिती करता येते. सध्या या प्लास्टिकच्या कडकपणावर काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रीती तायडे यांनी पोस्ट-डॉक्टरेट फेलोशिपकरिता (पीडीएफ) अर्ज केला आहे.

Web Title: Innovative laboratory by VIA-RSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.