अहो, झेब्रा क्रॉसिंग पायी चालणाऱ्यांसाठी आहे! वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 08:10 AM2023-07-15T08:10:00+5:302023-07-15T08:10:02+5:30

Nagpur News वाहनचालक झेब्रा क्रॉसिंग पार करून वाहने सिग्नलवर उभी करतात. हा प्रकार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आहे आणि त्यावर दंडात्मक कारवाईदेखील वाहतूक पोलीस करू शकतात. मात्र, नागपूरकर वाहनचालकांना दंडात्मक कारवाईनंतरही फरक पडत नाही.

Hey, zebra crossings are for pedestrians! Ignorance of the traffic police | अहो, झेब्रा क्रॉसिंग पायी चालणाऱ्यांसाठी आहे! वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष

अहो, झेब्रा क्रॉसिंग पायी चालणाऱ्यांसाठी आहे! वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष

googlenewsNext

रियाज अहमद

नागपूर : चौकातील सिग्नलवर असलेली झेब्रा क्रॉसिंग ही सिग्नल बंद असताना पायी चालणाऱ्यांसाठी आरक्षित केलेली व्यवस्था आहे. त्यामुळे सिग्नल लाल असले तर वाहनचालकांना झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबायचे आहे. पण, शहरात असे होताना दिसत नाही. वाहनचालक झेब्रा क्रॉसिंग पार करून वाहने सिग्नलवर उभी करतात. हा प्रकार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आहे आणि त्यावर दंडात्मक कारवाईदेखील वाहतूक पोलीस करू शकतात. मात्र, नागपूरकर वाहनचालकांना दंडात्मक कारवाईनंतरही फरक पडत नाही. ‘ लोकमत’ने वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी सुरू केलेल्या वृत्तमालिकेत असे आढळले की, वाहनचालकांना सिग्नल लागल्यानंतर झेब्रा क्रॉसिंगचे भानच राहत नाही.

- वाहतूक पोलिसही गंभीर नाही

शहरातील बहुतांश ट्रॅफिक सिग्नलवर वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवर येऊन उभे राहिल्याचे दिसून येते. वाहतूक पोलिस सिग्नलवर उभे असतानाही त्यांचे याकडे लक्ष नसते. खरे तर झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहणे अथवा तीन पार करणे हा प्रकार सिग्नल ब्रेक करण्याच्या श्रेणीत येते. त्यात १ हजार रुपये दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, वाहतूक पोलिस त्याकडे फारसे गांभीर्याने घेत नाही.

- बऱ्याच चौकात झेब्रा क्रासिंगवरील पेंटही निघाला

शहरातील काही भागातील झेब्रा क्रॉसिंग आकर्षक बनविण्यात आल्या आहेत. तर काही सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंगवरील पेंट निघाला आहे. त्यामुळेही वाहनचालक सिग्नल लागताच झेब्रा क्रॉसिंगवर येथून उभे राहतात. एलआयसी चौक, सेंटर जोसेफ स्कूलजवळील चौकातील झेब्रा क्रॉसिंगचा पेंट निघाला आहे.

- पागलखाना चौक

छिंदवाडा रोडवरील पागलखाना चौकात बनविण्यात आलेली झेब्रा क्रॉसिंग काहीच दिवसांपूर्वी बनविण्यात आली होती. या चौकात वाहनचालक क्रॉसिंगवर उभे राहतात, बरेच जण झेब्रा क्रॉसिंगही पार करतात.

आरबीआय चौक

वाहतूक सिग्नलच्या चारही भागात झेब्रा क्रॉसिंग आहे. येथे वाहतूक पोलिसही तैनात असतात. त्यानंतरही दुचाकी, चारचाकी वाहनचालक व अवजड वाहनांचे चालकही झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहतात.

- विधानभवन चौक

सिव्हिल लाइन्सच्या विधानभवन चौकात अनेकजण झेब्रा क्रॉसिंगवर उभे राहतात. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना अडचण होते.

व्हेरायटी व झांशी राणी चौक

या दोन्ही चौकांतील वाहतूक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगचे नियम पाळलेच जात नाही. शहरातील सर्वाधिक वाहनांची वर्दळ येथे असताना वाहनचालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. झांशी राणी चौकातील झेब्रा क्रॉसिंगही मिटली आहे.

झिरोमाइल चौक

महापालिका प्रशासनाने झिरोमाइल चौकातील झेब्रा क्रॉसिंगवर आकर्षक पेंटिंग करून लोकांना झेब्रा क्रॉसिंगचे महत्त्व पटवून दिले आहे. परंतु, येथे मनपाची आपली बसदेखील झेब्रा क्रॉसिंगवर उभी असल्याचे दिसून आले.

- सीए रोडवर सिग्नलही नाही आणि झेब्रा क्रॉसिंगही

सीए रोडवरील मेयो रुग्णालय चौक ते सेवासदनपर्यंत चौकात सिग्नलही नाही आणि झेब्रा क्रॉसिंगही नाही. दोसरभवन चौक, गीतांजली चौक सिग्नल अनेक वर्षांपासून बंद आहे. या चौकात झेब्रा क्रॉसिंगचा पेंट निघाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर दररोज वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते.

- झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभे करणे म्हणजे सिग्नल ब्रेक करण्यासारखेच आहे. असे करणाऱ्यांवर १ हजार रुपये दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिस कर्मचारी करू शकतो. झेब्रा क्रॉसिंग पार करणाऱ्या वाहनांवर चौकातील सीसीटीव्हीचा वॉच असतो, त्याच माध्यमातून कारवाई केली जाते.

- किशोर नगराळे, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

Web Title: Hey, zebra crossings are for pedestrians! Ignorance of the traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.