दिल्लीतील सायबर टोळीचा सदस्य लागला नागपूर पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:51 PM2018-12-13T23:51:45+5:302018-12-13T23:52:33+5:30

सेवानिवृत्त महिला प्राचार्याची २४ लाखाने फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एक सदस्य पोलिसांच्या हाती लागला. सायबर सेलने दिल्लीतील मंडोली गावात धाड टाकून २२ वर्षीय सनवर खान नफीज खान याला अटक केली आहे. अनेक दिवसानंतर दिल्लीतील कुण्या सायबर टोळीतील सदस्य पोलिसांच्या हाती लागला आहे.

In the hands of the Nagpur Police, a member of the cyber gang of Delhi | दिल्लीतील सायबर टोळीचा सदस्य लागला नागपूर पोलिसांच्या हाती

दिल्लीतील सायबर टोळीचा सदस्य लागला नागपूर पोलिसांच्या हाती

Next
ठळक मुद्देसेवानिवृत्त महिला प्राचार्याला २४ लाखाने फसविले होते : वर्षभरानंतर मिळाले पोलिसांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सेवानिवृत्त महिला प्राचार्याची २४ लाखाने फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील सायबर गुन्हेगारांच्या टोळीतील एक सदस्य पोलिसांच्या हाती लागला. सायबर सेलने दिल्लीतील मंडोली गावात धाड टाकून २२ वर्षीय सनवर खान नफीज खान याला अटक केली आहे. अनेक दिवसानंतर दिल्लीतील कुण्या सायबर टोळीतील सदस्य पोलिसांच्या हाती लागला आहे.
रामनगर निवासी शीला महापात्रा यांना २२ सप्टेंबर २०१७ रोजी मोबाईलवर फोन आला होता. त्यांना एचडीएफसी जीवन विमा पॉलिसीमध्ये साडेतीन लाखाचा बोनस मिळणार होता. फोन करणाऱ्याने महापात्रा यांना १४ लाख ८० हजार रुपयाचे बोनस देण्याचे आमीष दिले. यासाठी त्याने माहापात्रा यांना नाममात्र ५ हजार रुपये शुल्क भरण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर त्याने महापात्रा यांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली. त्याने जीएसटी, आयकर आणि इतर वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क सांगून महापात्रा यांच्याकडून २४ लाख ३८ हजार ९४५ रुपये वेगवेगळ्या खात्यात जमा करायला लावले. यानंतरही बोनसची रक्कम काही मिळाली नाही. शेवटी त्यांना संशय आला. त्यांनी आपल्या मुलीला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या माध्यमातून सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्याची माहिती काढली. त्यांनी बँकेला मॅसेज पाठवून १३ लाख ८५ हजार ४०३ रुपये फ्रीज करून घेतले. पोलीस मोबाईल नंबरच्या आधारावर आरोपीचा शोध घेत होते. त्यांना आरोपी दिल्लीतील हर्षविहारमधील मंडोली येथील रहिवासी असल्याचे आढळून आले. पोलिसांची चमू दिल्लीला पोहोचली. ११ डिसेंबर रोजी आरोपी सनवरला पकडण्यात आले.
सनवर हा या टोळीचा एक सदस्य आहे. या टोळीचे दिल्लीतील लक्ष्मीनगर आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे कॉल सेंटर आहे. तेथे ८ ते १० युवक काम करतात. ते फोन करून लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. या टोळीकडे अनेक खाते आहेत. त्यात ग्राहकांना रुपये जमा करण्यास सांगितले जाते. सनवरला नागपुरात आणून १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
ही कारवाई डीसीपी श्वेता खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भानुदास पिदूरकर, पीएसआय बलराम झाडोकर, कर्मचारी संतोष सिंह ठाकूर आणि अमित भुरे यांनी केली.
महिला आहे मूख्य सूत्रधार
या टोळीची मूख्य सूत्रधार एक महिला आहे. ती सनवर व इतर साथीदारांच्या मदतीने अनेक दिवसांपासून ही टोळी चालवीत आहे. सनवर पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागला. महिला पकडल्या गेल्यास आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळाल्यास, या टोळीच्या खुलाचा होऊ शकतो.

 

Web Title: In the hands of the Nagpur Police, a member of the cyber gang of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.