चारचाकीची तीन दुचाकींना धडक,सात जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 08:35 PM2019-04-18T20:35:11+5:302019-04-18T20:36:20+5:30

उमरेड-नागपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने एक नव्हे तर तीन दुचाकी वाहनांना जोरदार धडक मारली. यामध्ये सात जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Four-wheeler hit three bikes, seven injured | चारचाकीची तीन दुचाकींना धडक,सात जण जखमी

चारचाकीची तीन दुचाकींना धडक,सात जण जखमी

Next
ठळक मुद्देउमरेड-नागपूर महामार्गावर अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (उमरेड/कुही) : उमरेड-नागपूर महामार्गावर गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास चारचाकी वाहनाने एक नव्हे तर तीन दुचाकी वाहनांना जोरदार धडक मारली. यामध्ये सात जण जखमी झाल्याची माहिती आहे. यापैकी चार ते पाच जण गंभीर जखमी झाले. जयेश संजय राऊत रा.इतवारी पेठ, पीयूष रामरतन धांडे रा. उमरेड तसेच जयशीला राऊत, अन्वर अन्सारी, गुडीया अन्सारी, माही डहेरिया अशी जखमींची नावे आहेत. कुही पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजेपर्यंत या अपघाताची नोंद आणि माहिती उपलब्ध नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार एम.एच ३१-डीसी ६१२७ या क्रमांकाची कार नागपूर येथून उमरेडच्या दिशेने येत होती. अशातच महामार्गालगत असलेल्या व्हीआयटी महाविद्यालयाजवळ उमरेडकडून नागपूरकडे जाणाऱ्या एकूण तीन दुचाकींना एकापाठोपाठ जोरदार धडक लागली. अपघात होताच सर्वत्र धावपळ उडाली. काही काळ वाहतूक ठप्प पडली होती. एम.एच. ४९-टी.सी.डी.०५१, एम.एच. ४०-एडब्लू १२२९ आणि एम.एच. ४०-एयु २७३१ अशा एकूण तीन क्रमांकाच्या दुचाकीची नोंद घेण्यात आली आहे. अन्वर अन्सारी आणि अन्य काहींना वेकोलिच्या रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. काही गंभीर जखमींवर नागपूर ट्रामा सेंटर येथे उपचार सुरू आहेत.

Web Title: Four-wheeler hit three bikes, seven injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.