फवारणीचा जीवघेणा फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:45 AM2017-10-05T01:45:42+5:302017-10-05T01:45:53+5:30

शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक शेतकºयांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना नागपूर जिल्ह्यातही एका शेतकºयाचा मृत्यू झाला.

Fountain of life spray | फवारणीचा जीवघेणा फास

फवारणीचा जीवघेणा फास

Next
ठळक मुद्देशेतकºयाचा गेला जीव भिवापूरच्या धामणगावातील घटना तीन दिवसांपासून सुरू होते उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांद : शेतात फवारणी करताना विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक शेतकºयांचा मृत्यू झाला. हे प्रकरण ताजे असताना नागपूर जिल्ह्यातही एका शेतकºयाचा मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून सदर शेतकºयावर उपचार सुरू होता. त्यातच त्याचा मंगळवारी (दि. ३) मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेमुळे नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
प्रभाकर बापूराव मिसाळ (५१, रा. धामणगाव - गवळी, ता. भिवापूर, जि. नागपूर) असे मृत शेतकºयाचे नाव आहे. दसºयाच्या दुसºया दिवशी, रविवारी (दि. १) ते मुलासह शेतात कपाशीच्या फवारणीसाठी गेले. त्यांनी फवारणीपंपाद्वारे फवारणी सुरू केली तर त्यांचा मुलगा पाणी आणून देत होता. अशात त्यांना भोवळ आली. वाढत्या तापमानात गर्मीमुळे भोवळ आली असावी म्हणून त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. त्यानंतरही त्यांनी फवारणी सुरूच ठेवली. त्यातच त्यांच्या अंगावर फवारणीचे कीटकनाशक उडाले तसेच श्वसनाद्वारे आत गेले. त्यामुळे त्यांना उलटीचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी मुलाला सदर बाब सांगितली असता मुलाने त्यांना लगेच नांद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.
तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना तातडीने नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय (मेडिकल)मध्ये हलविले. तेथे तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होता. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अशात त्यांचा मंगळवारी मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला.
प्रभाकर यांच्या मृत्यूची माहिती बुधवारी सकाळच्या सुमारास धामणगावसह परिसरात मिळताच शोककळा पसरली. प्रभाकर यांची धामणगाव शिवारात सात एकर शेती आहे. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्तपरिवार आहे. प्रभाकर यांनी एका फायनान्स कंपनीसह सेवा सोसायटीकडून कर्जाची उचल केल्याची माहिती आहे.
कपाशीची पाती आणि फुलांची गळ वाढली
यावर्षी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. कपाशी सध्या जोमात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढते तापमान आणि परतीच्या पावसामुळे कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी पाती आणि फुलांची गळ वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यातून वाचण्यासाठी शेतकरी महागड्या कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याचे सर्वत्र चित्र आहे. ही फवारणीच शेतकºयांसाठी जीवघेणी ठरू पाहत आहे. यवतमाळातील घटनेनंतर आता नागपूर जिल्ह्यातही अशाप्रकारची घटना घडली.

Web Title: Fountain of life spray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.